अशोक चव्हाण ताठर माजी मुख्यमंत्री, गडी ऐकायलाच तयार नाही : नरेंद्र पाटील

खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झालंय," असा आरोप अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

अशोक चव्हाण ताठर माजी मुख्यमंत्री, गडी ऐकायलाच तयार नाही : नरेंद्र पाटील
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 8:17 PM

अहमदनगर :मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झालंय,” असा आरोप अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल चर्चा केली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवारांनी मराठा समाजाबद्दल एक शब्दही काढला नसल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला (Narendra Patil criticize Ashok Chavan over Maratha Reservation).

नरेंद्र पाटील म्हणाले, “दोन्ही सभागृहाच्या आमदारांनी मराठा समाजाबद्दल वेगवेगळे विषय मांडले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देणे गरजेचे आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आज तरी कुठल्या प्रकारे सकारात्मक नसल्याचं दिसतंय. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री असून ते किती ताठर आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी कुठल्याही मराठा क्रांती मोर्चा लोकांसोबत समन्वय साधला नाही.”

“9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला दिलेल्या 12 ते 13 टक्के आरक्षणाला स्थगिती मिळालीय. तसेच नवीन भरती करू नये या आरक्षणाच्या अंतर्गत त्याला देखील स्थगिती मिळाली. एकंदरच त्यांच्या योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे मराठा समाजाला बॅगफूटवर यावं लागलं.” असा आरोप नरेंद्र पाटलांनी केलाय.

“…तरी गडी ऐकायलाच तयार नाही”

नरेंद्र पाटील म्हणाले, “अशोक चव्हाण यांना खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि विनायक मेटे यांच्यासह इतर समन्वयक वेळोवेळी भेटून सांगत होते. पण तरी गडी ऐकायलाच तयार नाही. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांच्या योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झालंय.”

हेही वाचा :

मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर इंग्रजीत का केलं नाही? संभाजी राजे छत्रपती यांचा सरकारला सवाल

सुप्रीम कोर्टाचा OBC आरक्षणाबाबत निर्णय, ZP सदस्यांना धाकधूक

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

व्हिडीओ पाहा :

Narendra Patil criticize Ashok Chavan over Maratha Reservation

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.