‘अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये’, मराठा आरक्षणावरुन नरेंद्र पाटलांचा घणाघात
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे.
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरुन पुन्हा एकदा बोट ठेवलं जात आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेवू नये, चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला, असा घणाघात नरेंद्र पाटील यांनी केलाय. ते सोमवारी जालन्यात बोलत होते.(Narendra Patil criticizes Ashok Chavan on the issue of Maratha reservation)
अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेवू नये. अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला. चव्हाण यांनी राजीनामा तर द्यावाच पण त्यांच्या 5 पिढ्यांनी राजकारणात येऊ नये. मागच्या सरकारने मराठा समाजासाठई सुरु केलेल्या सवलतीही महाविकास आघाडी सरकारनं बंद केल्या, अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. नरेंद्र पाटील हे जालन्यात पत्राकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता राज्यभरात आंदोलन तीव्र करु, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय?
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करत असतील तर ते चुकीचं आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.
मागील आठवड्यात मराठा आरक्षणाबाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितलं की, ‘मराठा आरक्षणासंदर्भातील शासनाची भूमिका आम्ही याधीच स्पष्ट केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यात कोणताही बदल न करता, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे. यामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम विरोधक करत असतील, तर ते चुकीचं आहे. सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. आजही तिच भूमिका आहे. महाविकास आघाडीतही यासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत.’
संबंधित बातम्या :
‘… तर OBC कोट्यातून मराठा आरक्षण द्यावं’, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ‘या’ 11 मोठ्या मागण्या
गायकवाड कमिशन देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं फिक्सिंग; शेंडगेंचा आरोप
तरीही काही लोक आमच्यात अतिक्रमण करतायत: विजय वडेट्टीवार
Narendra Patil criticizes Ashok Chavan on the issue of Maratha reservation