Nashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय?
महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरायला राज्य शासनाने गेल्या महिन्यात मान्यता दिली. मात्र, विशेष म्हणजे या निर्णयाबद्दल महापौर, महासभा आणि चक्क स्थायी समितालाच प्रशासनाने अंधारात ठेवल्याचे समोर येत आहे.
नाशिकः एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. प्रशासन एकामागून एक नवनवे निर्बंध लादत आहे. किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या (Municipal Corporation) आरोग्य विभागात 348 पदे भरायला राज्य शासनाने गेल्या महिन्यात मान्यता दिली. मात्र, विशेष म्हणजे या निर्णयाबद्दल महापौर (Mayor), महासभा आणि चक्क स्थायी समितालाच प्रशासनाने अंधारात ठेवल्याचे समोर येत आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेमके प्रकरण काय?
महापालिकेतील 845 पद भरतीला नगरविकास खात्याने सुरुवात केलीय. त्यात पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरली जाणार आहेत. यासाठी 8 डिसेंबर 2021 रोजी मान्यता देण्यात आली. मात्र, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे यांनी ही बाब महापौर, महासभा आणि स्थायी समितीपासून लपवून ठेवल्याचे समोर येत आहे. खरे तर नियमानुसार शासनाचे महत्त्वाचे आदेश, पत्रव्यवहार हा महासभा आणि स्थायी समितीसमोर ठेवला जातो. मात्र, या संकेताला फाटा देत प्रशासनाने मनमानी कारभार सुरू केल्याचे बोलले जात आहे.
विलंबाचे कारण हे की…
महापौरांसह साऱ्या नगरसेवकांचा कार्यकाल मार्च महिन्यात संपत आहे. या नोकरभरतीत या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप राहू नये म्हणून ऐन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही या निर्णयाची माहिती महापौरांना दिली नसल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे रोज हजाराच्यावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. अनेक नागरिक घरच्या घरी कोरोना टेस्ट करत आहेत. तशी रुग्णांची संख्याही कित्येक पट आहे. प्रशासन रोज एक निर्बंध लादत आहे. अशा परिस्थितीतही महापालिकेतील तीही चक्क आरोग्य विभागीतल नोकरभरतीत विलंब करण्यात येत असल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या कृतीबद्दल अनेक नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. आता ही नोकरभरती रखडू म्हणजे झाले, अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
या पदांना मिळाली मंजुरी
– वैद्यकीय अधीक्षक – 2
– निवासी वैद्यकीय अधिकारी – 2
– सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 1
– वैद्यकीय अधिकारी – 58
– वैद्यकशास्त्र तज्ज्ञ – 8
– शल्यचिकित्सक – 18
– स्त्री रोग तज्ज्ञ – 16
– बालरोग तज्ज्ञ – 16
– क्ष किरण तज्ज्ञ – 4
– बधिरीकरण तज्ज्ञ – 9
– अस्थिव्यंग तज्ज्ञ – 4
– नेत्रशल्यचिकित्सक – 4
– सिस्टर (हेडनर्स) – 14
– स्टाफ नर्स – 10
– एएनएम – 74
– मिश्रक – 26
– प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 6
– वॉर्डबॉय – 11
– आया – 30
इतर बातम्याः
Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?
Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन