Nashik Accident| सेल्फी हजेरीची धावपळ कर्मचाऱ्याच्या जीवावर; दुसऱ्या घटनेत सायकलपटूला उडवले!

पहिल्या घटनेमध्ये सेल्फी हजेरीसाठी जाणाऱ्या एका महापालिका कर्मचाऱ्याला वाहनाने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत एका वृद्ध सायकलपटूला अज्ञात वाहनाने उडवले. त्यामुळे त्यांचे जागेवरच प्राण केले.

Nashik Accident| सेल्फी हजेरीची धावपळ कर्मचाऱ्याच्या जीवावर; दुसऱ्या घटनेत सायकलपटूला उडवले!
accident
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 1:40 PM

नाशिकः नाशिकमध्ये दोन चुटपूट लावणारे भीषण अपघात झाले. या घटनांनी शहरवासीयांना चटका लावलाय. त्यात पहिल्या घटनेमध्ये सेल्फी हजेरीसाठी जाणाऱ्या एका महापालिका कर्मचाऱ्याला वाहनाने उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत एका वृद्ध सायकलपटूला अज्ञात वाहनाने उडवले. त्यामुळे त्यांचे जागेवरच प्राण गेले.

पहिली घटना…

आडगाव शिवारातील संतोष चंद्रभान जाधव (वय 45) हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. पंचवटी आरोग्य केंद्रात त्यांची ड्युटी असते. जाधव नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पावणेसहा वाजता ड्युटीसाठी आले. त्यांना रोज सेल्फी काढून ही हजेरी महापालिकेत सबमिट करावी लागते. त्यासाठी ते घाईगडबडीत गणेशवाडीत असलेल्या शेडवरून दुचाकीवरून अमृतधाम चौफुलीकडून जुना आडगाव नाक्याकडे येते होते. मात्र, त्यावेळेस एका मालट्रकने त्यांना धडक दिली. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. महापालिकेने केलेल्या सेल्फी हजेरीच्या धावपळीमुळेच जाधव यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.

दुसरी घटना…

सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने रविवारी नाशिक-मनमाड सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारा ते मनमाड येथील गुरुद्वारा साहिब अशी ही 90 किलोमीटरची सायकल राइड होती. या राइडमध्ये सहभागी होण्यासाठी भास्कर काळे (वय 63) हे वृद्ध सायकलपटू पहाटेच घरातून निघाले होते. मात्र, सिडको येथून गोविंदनगरमार्गे उड्डाणपूलावरून येताना बायपासजवळ त्यांना अज्ञान वाहनाने उडवले. या धडकेत काळे यांचा मृत्यू झाला. ते सातपूरच्या टापरिया टूल्स कंपनीमधऊन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायकलिस्ट पदाधिकारी धावले

सायकलपटू काळे हे सिडको येथून सर्व्हिसरोडने गेले असते, तर कदाचित ही दुर्घटना टळली असती, अशी चर्चा परिसरात होती. या अपघाताचे वृत्त समजताच सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत काळे यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. काळे यांच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देण्यात आली. तिथे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गर्दी केली होती. या घटनेबद्दल सायकपटूंमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोनाची आकडेवारी किती; कोणत्या बड्या अधिकाऱ्यांनी घेतले बूस्टर डोस?

Gold Price| आली लगीन सराई, करा स्वस्तातले सोने खरेदीची घाई, जाणून घ्या राज्यातले दर…!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...