महाविकास आघाडीचा वार, उद्धव ठाकरे यांचा भाजपला तर शरद पवारांचा अजित पवारांना ‘जोर का झटका’

नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने उमेदवारीसाठी झुलवत ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मोठ्या अपेक्षेने गेलो होतो.

महाविकास आघाडीचा वार, उद्धव ठाकरे यांचा भाजपला तर शरद पवारांचा अजित पवारांना 'जोर का झटका'
शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 12:30 PM

राज्यातील राजकारणात रविवारी दोन मोठ्या घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाले आहे. छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देत आहेत तर नाशिकमध्ये शरद पवार अजित पवार यांना धक्का देत आहे. या दोन्ही ठिकाणाचे बडे पदाधिकारी पक्ष सोडून नवीन ठिकाणी जात आहेत. अजित पवार गटाला नाशिकमध्ये शरद पवार गटाचा धक्का आहे. नाशिकचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करत आहे. त्यांच्यासोबत १०० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना नाशिक जिल्ह्यात हा मोठा धक्का आहे.

कामे होत नसल्याने सोडला पक्ष

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या. शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या. परंतु अजित गटाला एकच जागा मिळाली. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने उमेदवारीसाठी झुलवत ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. मात्र लोकांची काम होत नव्हती. त्यामुळे आज पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत आहे.

हे सुद्धा वाचा

छत्रपती संभाजीनगरात भाजपला धक्का

शरद पवार नाशिकमध्ये अजित पवार यांना धक्का देत असताना छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देत आहे. भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे भाजपसोडून शिवसेनेत जात आहे. त्यांच्यासोबत 6 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जात आहेत. तसेच अनेक पदाधिकारी आहे. गोकुळ मलके (नगरसेवक भाजप), प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप), अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी), प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष), रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) हे शिवसेनेत जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आहे. महाविकास आघाडीची कामगिरी चांगली झाली. भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या. काँग्रेस 13 जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 9 जागा जिंकल्या. तर शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या. अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. परंतु शरद पवार गटाने दहा जागा लढवत आठ ठिकाणी विजय मिळवला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.