Nashik Corona | कोरोनाचे पुन्हा 4 बळी, किती रुग्णांवर उपचार सुरू, आजचा रिपोर्ट काय?

सध्या नाशिक जिल्ह्यात बहुतांश रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याच्या प्रमाणात प्रचंड घट झालेली दिसतेय.

Nashik Corona | कोरोनाचे पुन्हा 4 बळी, किती रुग्णांवर उपचार सुरू, आजचा रिपोर्ट काय?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 2:30 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोना (Corona) रुग्णांचे मृत्यू दिवसागणिक सुरू आहेत. आता पुन्हा एकदा 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 14 फेब्रुवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यात नाशिक महापालिका (Municipal Corporation) क्षेत्रात 2 आणि नाशिकच्या ग्रामीण भागात 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 64 हजार 524 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 120 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यात बहुतांश रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याच्या प्रमाणात प्रचंड घट झालेली दिसतेय.

आजचे रुग्ण किती?

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 116, बागलाण 67, चांदवड 51, देवळा 39, दिंडोरी 107, इगतपुरी 38, कळवण 62, मालेगाव 19, नांदगाव 42, निफाड 159, पेठ 27, सिन्नर 120, सुरगाणा 63, त्र्यंबकेश्वर 58, येवला 90 असे एकूण 1 हजार 68 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 231, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 13 तर जिल्ह्याबाहेरील 40 रुग्ण असून, असे एकूण 1 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 754 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण किती?

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.96 टक्के, नाशिक शहरात 98.41 टक्के, मालेगावमध्ये 97.28 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के इतके आहे. कोरोनामुळे नाशिक ग्रामीण भागात 4 हजार 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 95, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आठवड्यात 33 मृत्यू

नाशिकमध्ये 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार हे बळी गेल्याचे समोर आले आहे. यातले 18 बळी हे नाशिक महापालिका क्षेत्रात गेलेत, तर 16 बळी हे नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काल 12 फेब्रुवारी रोजी सुद्धा 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. त्यात 3 रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत, तर उर्वरित 2 रुग्ण हे नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत.

14 फेब्रुवारी रोजी कळवलेले मृत्यू

नाशिक मनपा – 02 मालेगाव मनपा – 00 नाशिक ग्रामीण – 02 जिल्हा बाह्य – 00

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.