कोरोनाचा भुंगा…नाशिक जिल्ह्यात अजून 460 रुग्णांवर उपचार सुरू, महापालिका क्षेत्रात 205 रुग्ण

| Updated on: Dec 22, 2021 | 3:17 PM

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 205, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 08 रुग्ण आहेत.

कोरोनाचा भुंगा...नाशिक जिल्ह्यात अजून 460 रुग्णांवर उपचार सुरू, महापालिका क्षेत्रात 205 रुग्ण
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात अजून 460 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 205 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 128 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रात वाढ

नाशिक जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महापालिकेने जे नागरिक मास्क घालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा दिला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नियमाचे कोणीही पालन करत नाही. सुरक्षित अंतर आणि इतर नियम सोडा. मात्र, बहुतांश ठिकाणी नागरिक मास्कच वापरत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढले, तर आश्चर्य वाटू नये. त्याची चुणूक सध्याच दिसत असून, पु्न्हा एकदा नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या आकड्याने दोनशेचा आकडा पार केला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 205, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 08 रुग्ण आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 33, बागलाण 17, चांदवड 07, देवळा 09, दिंडोरी 15, इगतपुरी 38, कळवण 07, मालेगाव 07, नांदगाव 11, निफाड 55, पेठ 02, सिन्नर 27, सुरगाणा 09, त्र्यंबकेश्वर 02, येवला 02 अशा एकूण 241 रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 335 रुग्ण आढळून आले आहेत.

मास्क वापरा, सुरक्षित रहा

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात अजून 460 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 205 रुग्णांचा समावेश आहे.

-डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

Nashik Market Committee| नाना विघ्ने, खुसपटांमुळे लांबलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त

OBC reservation| ओबीसी आरक्षणासाठी समता परिषद मैदानात; नो रिजर्व्हेशन, नो इलेक्शनचा नारा

Republic Day| आरोग्य विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी 2 विद्यार्थ्यांची निवड