Nashik Corona: कोरोनाला चित करण्याचा निर्धार; 110 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसवले 226 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 6 लाख नागरिक कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांनी हा डोस घेण्यासाठी चालढकलपणा केल्याचे समोर येत आहे.

Nashik Corona: कोरोनाला चित करण्याचा निर्धार; 110 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसवले 226 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
Oxygen concentrator
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 7:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाने अक्षरशः युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील 110 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने 226 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या केंद्रांमध्ये प्रति मिनिट 10 लिटर ऑक्सिजन मिळणार आहे. शिवाय प्रशासनाने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही वेग दिला आहे. ग्रामीण भागामध्ये सर्दी-पडशाच्या प्रत्येक रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.

मात्र यांनी वाढवली चिंता

जिल्ह्यामध्ये तब्बल 6 लाख नागरिक कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांनी हा डोस घेण्यासाठी चालढकलपणा केल्याचे समोर येत आहे. एकीकडे रुग्ण चौपट वाढत असल्याने प्रशासनासमोर नवेच संकट आहे. त्यात नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ डोकेदुखी ठरत आहे. आपल्या कुटुंबाची दक्षता ध्यानात घेता, प्रत्येकाने स्वतःहून लसीकरणासाठी पुढे यावे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

करडी नजर ठेवणार

जिल्हाधिकारी कार्यालयाने कोविड विरोधात लढा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. कोविड नियंत्रण कक्षांची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. त्यांना लसीकरण नियंत्रण, कोविड सेंटर निर्मिती, कोविड मृतांच्या नातलगांना सानुग्रह अनुदान देणे, रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने योग्य ते नियोजन करणे आधी जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. जिल्हाधिकारी या साऱ्यांवर करडी नजर ठेवून आहेत.

पालिकाही तयार

नाशिकमध्ये महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.

खाटांची चोख सोय

महापालिका रुग्णालयांमध्ये 8 हजार खाटा सज्ज आहेत. 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.

इतर बातम्याः

Nashik Gas Leakage|गॅसच्या भडक्याने काचा फुटल्या, दरवाजा तुटला, 6 जण होरपळले!

Hogade on Mahavitaran| 12 हजार कोटींची वीजचोरी; कृषिपंपाचा वीजवापर फक्त 15 टक्के, होगाडेंचा आरोप

Nashik Crime: नाशिकमध्ये गुन्हेगारांना मोकळे रान; चक्क पोलीस ठाण्याजवळून भरदिवसा तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.