Nashik Corona| ओमिक्रॉनने झपाटले; नाशिकमध्ये एका दिवसात 1 हजाराने वाढले रुग्ण
नाशिकमध्ये चक्क एका दिवसात 1 हजाराने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
नाशिकः नाशिकमध्ये अतिशय भयंकर झपाट्याने कोरोना रुग्णात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कालच्या तुलनेत आज चक्क1 हजाराने कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार सद्यस्थितीत 3 हजार 550 रुग्णांवर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे काल शनिवारी ही रुग्णसंख्या 2 हजार 566 होती. त्यात जवळपास हजाराने वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोरोनाचा अक्षरशः गुणाकार सुरू झाल्याचे दिसते आहे.
येथे आहेत बाधित
जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 428 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 132, बागलाण 23, चांदवड 14, देवळा16, दिंडोरी 114, इगतपुरी 42, कळवण 21, मालेगाव 12, नांदगाव 26, निफाड 185, सिन्नर 63, सुरगाणा 4, त्र्यंबकेश्वर 11, येवला 15 असे एकूण 678 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 हजार 738, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 27 तर जिल्ह्याबाहेरील 107 रुग्ण असून असे एकूण 3 हजार 550 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 17 हजार 741 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 33, बागलाण 07, चांदवड 04, देवळा 04, दिंडोरी 18, इगतपुरी 21, कळवण 05, मालेगाव 03, नांदगाव 05, निफाड 67, सिन्नर 22, त्र्यंबकेश्वर 03, येवला 09 असे एकूण 201 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
नियम जरूर पाळा
ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. त्यात आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या काळाता कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीतरी पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात 13 लाख 63 हजार नागरिकांपैकी 12 लाख 64 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यात एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे. यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच कोरोनाचे प्रतिबंधक नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?
Nashik Corona|कोरोनाविरोधात लढा आमचा सुरू; 13 अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशासनाने काय केली तयारी?
Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!