AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सतर्क, जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू

शहरातील मॉल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेस्टॉरंट दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील, त्यानंतर पार्सल सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सतर्क, जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू
नाशिक पोलीस
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:25 AM

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा, डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक प्रशासनाकडून सोमवारपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील मॉल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेस्टॉरंट दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील, त्यानंतर पार्सल सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Strict restrictions on corona delta virus in Nashik district from today)

अजून एक महत्वाची बाब म्हणजे 4 जुलैपासून विकेंड लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने दुपारी 4 नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारी 4 नंतर दुकाने सुरु ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही पुन्हा चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे व्यापाऱ्यांकडून दुपारी 4 नंतर दुकाने बंद करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मेन रोड, शालिमार, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात पोलिसांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितलं. पोलिसांच्या पथकाकडून शहरात सर्वत्र दुकानांची तपासणी करण्यात आली.

नाशिक पोलीस अ‌ॅक्शन मोडवर

विकेंडला विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस अ‌ॅलर्ट झाले आहेत. नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये निदर्शनास आलं होतं. हे बघता नाशिक पोलिसांनी कडक इशारा दिलाय. अत्यावश्यक काम वगळता विनाकारण गर्दी कराल तर थेट कारवाईला सामोरे जावं लागेल, असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.

जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत :

> पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे

> टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे

> हवेमधून पसरू शकणाऱ्या करोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे

> मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे

> करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे

> गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे

> कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील

राज्यभरात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

1. अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. 2. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. 3. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. 4. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 5. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. 6. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. 7. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. 8. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. 9. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. 10. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 11. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल. 12. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

संबंधित बातम्या :

विकेंडला पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करताय, विनाकारण घराबाहेर पडल्यास हमखास कारवाई , नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर

नवी मुंबईत नवे निर्बंध, दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

Strict restrictions on corona delta virus in Nashik district from today

Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.