Nashik | नाशिकमध्ये रहिवासी सोसायट्यांना आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती; पर्यावरणस्नेही निर्णय घेणारी पहिली पालिका
महापालिकेने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या नियमाची मंगळवार, 21 डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम प्रस्ताव सादर करताना त्यात ही तरतूद आहे की नाही, हे पाहिले जात आहे.
नाशिकः नाशिककरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. सध्या वाढत्या इंधन दराने सगळेच हैराण झाले आहेत. त्यामुळे चारचाकी वाहन बाहेर काढणेही अनेकांना जीवावर येते. सध्या तर दुचाकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा चांगला बोलबाला सुरूय. हेच ध्यानात घेता आणि काळाची पावले ओळखून आता नाशिक महापालिकेने रहिवासी सोसायट्यांना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे असा पर्यावस्नेही निर्णय घेणारी ही राज्यातली पहिलीच महापालिका ठरली आहे. या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
नेमके काय होणार?
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी नगररचना विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता 25 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात येणार आहे. 51 पेक्षा अधिक घरे असतील तर त्या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सक्तीचे करण्यात आले आहेत. पूर्ण वाणिज्य क्षेत्र पाचशे चौरस मीटरपर्यंत असेल, तर दोन चार्जिंग स्टेशन आणि पाचशे चौरस मीटरपेक्षा जास्त असे तर चार चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात आली आहे.
अंमलबजावणी सुरू
नाशिक महापालिकेने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या नियमाची मंगळवार, 21 डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम प्रस्ताव सादर करताना त्यात ही तरतूद आहे की नाही, हे पाहिले जात आहे. चार्जिंग स्टेशनची सोय नसल्यास त्या प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही. या निर्णयाचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल पालिकेचे आभार मानले आहेत.
इलेक्ट्रिकल वाहन खरेदी
या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या केंद्र सरकार क्लीन एअर मिशन राबवत आहे. त्यातही महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणतेही नवीन वाहन खरेदी करताना महापालिका एक तर इलेक्ट्रिकल किंवा सीएनजी वाहन खरेदी करणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नक्कीच पर्यावरणाच्या प्रदूषणाला आळा बसणार आहे. महापालिकाही येणाऱ्या काळात नवीन वाहन खरेदी करताना एक तर इलेक्ट्रिकल किंवा सीएनजी वाहन खरेदी करणार आहे. असाच निर्णय नागरिकांनी घ्यावा आणि पर्यावरणाला जपावे.
– कैलास जाधव, महापालिका आयुक्त
इतर बातम्याः
Health | Nails | नखं सांगतात ‘तुमचं आरोग्य कसं आहे?’ एका क्लिवर जाणून घ्या, काय सांगतात तुमची नखं?
Stretch Marks | स्ट्रेच मार्क्समुळे वैतागलात? हवे तसे कपडे घालता येत नाही? करा ‘हे’ घरगुती उपाय
‘पेट’से हिंदुस्थानी : ना पिझ्झा, ना बर्गर; भारतीयांची ‘या’ खाद्यपदार्थाला सर्वाधिक पसंती!