Nashik | स्ट्रक्चरल ऑडिट न करताच रामसेतू कसा पाडणार; स्मार्ट सिटी संचालकांचा सवाल, वादात काँग्रेसची उडी
काँग्रेसचे नगरसेवक तथा स्मार्ट सिटी संचालक शाहू खैरे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित गेट बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळेसच आपण नदीवरील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना केली होती. मात्र, ते कोणीही मनावर घेतले नाही.
नाशिकः ऐन महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) रामसेतू (Ramsetu) पुलाच्या मुद्दाने चांगलाच वाद पेटलाय. आता या प्रश्नात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने उडी घेतलीय. स्ट्रक्चरल ऑडिट न करताच रामसेतू कसा पाडणार, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक तथा स्मार्ट सिटी संचालक शाहू खैरे यांनी केलाय. याबाबत कंपनीचे अध्यक्ष आनंद लिमये यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनीदिलाय. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकचे ऐतिहासिक वैभव उद्धव करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्या वतीने रामसेतू पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचा दावा करण्यात आला होता.आता त्या दाव्यालाच छेद देण्यात आलाय.
प्रशासन काय म्हणते?
गोदावरी तीरावर 60 वर्षांपूर्वी रामसेतू बांधला. मात्र, या भागात नेहमी गर्दी असते. कुंभमेळा, यात्रा यासाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावतात. मात्र, महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करून हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. तो तसाच ठेवला, तर धोका उद्भभवू शकतो. तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे हा पूल पाडणे गरजेचे आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आता सव्वाशे कोटी लागतील
काँग्रेसचे नगरसेवक तथा स्मार्ट सिटी संचालक शाहू खैरे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित गेट बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळेसच आपण नदीवरील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना केली होती. मात्र, ते कोणीही मनावर घेतले नाही. रामसेतू 1955 मध्ये बांधला. यावेळी गाडगेमहाराज पुलाचे काम फक्त लाख रुपयात झाले. आता या दोन्ही पुलाचे काम करायचे झाल्यास सव्वाशे कोटी रुपये लागतील. शिवाय रामसेतू पुलाच्या दोन्ही बाजूला मंदिरे आहेत. एका टोकाला नारोशंकर आणि दुसऱ्या टोकाला बालाजी कोट. मात्र, पुलाची उंची वाढवल्यास या मंदिरांना धोका होईल, त्याचे काय असा सवालही त्यांनी केला आहे. आता या वादात इतर राजकीय पक्षही उडी घेण्याची शक्यताय.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!