नाशिकमधील काळाराम मंदिर प्रकरणात पत्र काढणाऱ्यास अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रामागील…

nashik kalaram mandir letter: आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले आहे. त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे.

नाशिकमधील काळाराम मंदिर प्रकरणात पत्र काढणाऱ्यास अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रामागील...
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 12:41 PM

नाशिकमधील काळाराम मंदिराच्या परिसरात आक्षेपार्ह पत्रके वाटण्यात आले होते. या पत्रकारावर काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचे म्हटले होते. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. नाशिकमध्ये शनिवारी (२२ जून) पंचवटी परिसरात चार तास तणावाचे वातावरण होते. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार केला गेल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

माध्यमांशी नाशिकमधील प्रकाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढलेली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले आहे. हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधले जात आहे.

आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त

आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त केले आहे. त्या व्यक्तीच्या पाठिशी कोण आहेत? दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे. हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुती निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत.

हे सुद्धा वाचा

राजकीय नेत्यांचे टोचले कान

काही राजकीय नेत्यांनी हे पत्र ट्विट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्याकडून हा प्रकार झाला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल. यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.