Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Market Committee| नाना विघ्ने, खुसपटांमुळे लांबलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आठवडाभरात पुन्हा एकदा अधिसूचना निघेल आणि जानेवारीत मतदान होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nashik Market Committee| नाना विघ्ने, खुसपटांमुळे लांबलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 10:46 AM

नाशिकः मुदतवाढीवरून मुदतवाढ मिळालेल्या, कोरोनामुळे लांबलेल्या आणि नाना विघ्ने, खुसपटे आड येणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे आठडाभरात या निवडणुकीची पुन्हा एकदा अधिसूचना निघेल आणि जानेवारीत मतदान होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिक बाजार समितीचा कार्यकाळ 19 ऑगस्ट 2021 रोजी संपला आहे. मात्र, कोरोनाच्या भयंकर लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीला दोनवेळेस मुदतवाढ देण्यात आली. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. त्यानंतरही सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक लांबणीवर

न्यायालयाने यापूर्वी एका निकालात आधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रद्द केला. विभागाने प्रारूप मतदार यादी जाहीर करणे आणि त्यावर हरकती मागणविणेही पुढे ढकलले. बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गट आहे. कोरोनामुळे सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे या गटातील सदस्यांना बाजार समिती निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागले असते. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीआधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे पाहता जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलला होता. त्यामुळे नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा बाजार समिती आदींची निवडणूक पुढे ढकलली गेली.

वेळापत्रकानुसार निवडणुका

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम रद्द झाला आहे. त्यामुळे आता बाजार समितीची निवडणूक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत समितीवर प्रशासक नेमावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत सध्या प्रशासक नेमणार नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसार बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले. त्यामुळे आठडाभरात या निवडणुकीची पुन्हा एकदा अधिसूचना निघेल आणि जानेवारीत मतदान होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्याः

Republic Day| आरोग्य विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी 2 विद्यार्थ्यांची निवड

Nashik| पतंग उडवताना बाळाच्या आयुष्याची दोरी तुटली…दोन मिनिटांत होत्याचे नव्हते!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.