Nashik महापालिका निवडणूक | अवघ्या 10 दिवसांत जाहीर होणार प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम

नाशिक महापालिका निवडणुकीत आता धुरळा उठणार असून, अवघ्या दहा दिवसांमध्ये प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Nashik महापालिका निवडणूक | अवघ्या 10 दिवसांत जाहीर होणार प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम
नाशिक महापालिका.
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:16 PM

नाशिकः नाशिक महापालिका निवडणुकीत आता धुरळा उठणार असून, अवघ्या दहा दिवसांमध्ये प्रारूप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी छाननी केली. आता ही प्रभागरचना अंतिम करण्यात येईल. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागले.

छाननी कशी झाली?

प्रत्येक प्रभागानुसार निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यात चतुःसीमा, रस्ते, नदी-नाले याच्या नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासण्यात आले. नाशिकमधील काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप होते. ते सुद्धा ध्यानात घेतले. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली. आता राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत या प्रभागरचनेला अंतिम रूप देणार असल्याचे समजते. त्यानंतर ती जाहीर करण्यात येईल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्याबाबत ऐनवेळी येणाऱ्या सूचना लक्षात घेऊन ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

गुडघ्याला बाशिंग

नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यापूर्वीच अनेकांनी आपापल्या वॉर्डात आपल्याच तिकीट मिळेल अस गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आतापासूनच मतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, आता निवडणूक आयुक्त कच्च्या आराखड्याची पडताळणी करतील. प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होईल आणि आरक्षण सोडत निघेल. त्यानंतर प्रभागरचना जाहीर होईल. त्यावरच्या हरकती मागवल्या जातील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम चालेल अशी शक्यता आहे. या प्रक्रियेनंतर निवणडणुकीची घोषणा होईल.

ओमिक्रॉनचे सावट

राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. मात्र, सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

इतर बातम्याः

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

scam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.