इलेक्शनचा धुरळा, नाशिक महापालिकेत 151 नगरसेवक होणार!

बहुचर्चित नाशिक महापालिकेची नगरसेवक संख्या आता 122 वरून थेट 151 होणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार झाला असून, नगरविकास खाते त्यावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते.

इलेक्शनचा धुरळा, नाशिक महापालिकेत 151 नगरसेवक होणार!
नाशिक महापालिका.
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 11:36 AM

नाशिकः बहुचर्चित नाशिक महापालिकेची नगरसेवक संख्या आता 122 वरून थेट 151 होणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार झाला असून, नगरविकास खाते त्यावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते.

नाशिकमध्ये 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे जुन्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली. सध्या अंदाजे 30 लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात 151 नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव आहे. सध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकी तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने काम सुरू केले आहे. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यास या रचनेत पुन्हा बदल होऊ शकतो.

राजकीय परिणाम असा

नगरसेवकांची संख्या वाढली, तर त्याचा राजकीय परिणामही अनेकांना महाग पडू शकतो. महाविकास आघाडी नाशिक महापालिकेत आकारास येणार का, याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. ही आघाडी आकाराला आली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपचे सुत जुळू शकते. त्यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर महाविकास आघाडी आकाराला नाही आली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थोडे जड जाऊ शकते. प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याचीही अडचण होऊ शकते.

तर पुन्हा रचना बदलणार

येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर 22 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. त्यासाठीनाशिकची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. सध्याच्या कामानुसार प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम दिवाळीनंतरच जाहीर होणार होता. सध्या कच्च्या प्रभागरचेने काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, आता नगरसेवकांच्या संख्येत बदल झाला तर ही रचनाही बदलू शकते. प्रभाग रचना कार्यक्रमालाही पुन्हा विलंब लागू शकतो.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67 शिवसेना 34 काँग्रेस 6 राष्ट्रवादी 6 मनसे 5 इतर 3

सध्याचे प्रभाग

29 प्रभाग 4 सदस्यीय 2 प्रभाग 3 सदस्यीय

अशी राहील नवी प्रभाग रचना?

40 प्रभाग 3 सदस्यीय 1 प्रभाग 2 सदस्यीय

इतर बातम्याः कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, 15 हजारांच्या सानुग्रह अनुदानावर महासभेत शिक्कामोर्तब

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.