Nashik| 6 नगरपरिषदांवर प्रशासक; तर 6 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील 11 ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Nashik| 6 नगरपरिषदांवर प्रशासक; तर 6 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:13 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 29 डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या 6 नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. तसे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. सध्या जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींच्या 49 जागांसाठी निवडणूक झाली असून, सहा नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. मात्र, या सहा नगरपरिषदांचा कार्यक्रम वाढता कोरोना पाहता लगेच जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनमाडच्या नगरपरिषदेवर डॉ. विजयकुमार मुंढे, सिन्नर अर्चना पठारे, येवला सोपान कासार, नांदगाव विवेक धांडे, सटाणा बबन काकडे आणि भगूर येथे वर्षा मीना यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6 नगरपंचायतींची निवडणूक

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर, देवळा येथे फक्त 11 जागांवर निवडणूक होतेय. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.

अशी रंगली रणधुमाळी

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.

19 जानेवारी रोजी मतमोजणी

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील 11 ओबीसी राखीव जागा आता खुल्या प्रवर्गात मोडणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल.

इतर बातम्याः

खोदता खोदता पहाड सापडे? आता जैनच्या कन्नौजच्या घरातून 19 कोटी रोख सापडले, 23 किलो सोने

ESIC Recruitment : ईएसआयसीमध्ये 3600 पदांची जम्बो भरती, दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.