Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
नाशिकमध्ये प्रारूप प्रभाग रचनेने अनेक विद्यमान नगरसेवकांना अपेक्षेप्रमाणे धक्क्यावर धक्के दिलेत. शहरातील बहुतांश प्रभागांची मोडतोड झालीय. त्याचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम विभागात जास्त आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची निवडणूक (Municipal Election) कधी जाहीर होईल माहिती नाही. मात्र, तत्पूर्वीच राजकीय आखाड्यात रंगत आलीय. प्रारूप प्रभाग रचनेने अनेक विद्यमान नगरसेवकांना अपेक्षेप्रमाणे धक्क्यावर धक्के दिलेत. शहरातील बहुतांश प्रभागांची मोडतोड झालीय. त्याचे प्रमाण पूर्व आणि पश्चिम विभागात जास्त आहे. जुन्या नाशिकमध्ये दोन प्रभाग एकत्र केलेत. त्यामुळे त्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. कोकणी पुरा, गंगावाडी, जुने नाशिकमधील प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुकांना नव्याने राजकीय गणिते आणि जुळवाजुळव करावी लागणार आहे. विशेषतः महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह अनेक नगरसेवकांना या मोडतोडीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे यंदा कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
महापौरांना फटका
प्रारूप प्रभाग रचनेचा धक्का स्वतः महापौर सतीश कुलकर्णीय यांनाही बसला आहे. यंदा नाशिकमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रनचेनुसार महापालिका निवडणूक होणार आहे. महापौरांच्या प्रभाग क्रमांक 23 मधून बजरंगवाडी भाग तुटला आहे. तो आता खोडेनगर, साईनाथनगर, अमृत वर्षा कॉलनी, जयदीप कॉलनी, मिन्नतनगर, निसर्ग कॉलनीला जोडला आहे. त्यामुळे बजंरगवाडी भागातील साडेचार हजार मतांवर त्यांना पाणी सोडावे लागेल.
आक्षेप कोण-कोण नोंदवणार?
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. महापालिकेच्या वतीने या हरकती 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत या हरकती आणि सूचनांवर सुनावणी होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी या विहित नमुन्यात विवरण पत्रासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. मात्र, आता आक्षेप कोण-कोण नोंदवणार हे पाहावे लागेल.
नगरसेवकांची संख्या 133
महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला.
इतर बातम्याः
टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?
Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?