AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नाशिकमध्ये नाले गेले चोरीला, नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, प्रकरणाचे गुपित काय?

नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक नाल्यांचा विषय चर्चेत आहे. यातले अनेक नाले विकासकांनी गिळंकृत करून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. काही ठिकाणी नाले बळकावण्याचे आणि बुजविण्याचे षढयंत्र सुरू आहे.

Nashik | नाशिकमध्ये नाले गेले चोरीला, नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, प्रकरणाचे गुपित काय?
Nashik Municipal Corporation
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:24 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाले चोरीला गेले आहेत बरे का. बरे हे कोणी सामान्य नागरिक वैगेरे नाही म्हणत. तर चक्क नगरसेवक (Corporator) म्हणतायत. त्यांनीच याप्रकरणी महाालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवरही धरले. हे सारे चक्रावरणारे प्रकरण सातपूर विभागीय कार्यालयात झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत घडले. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर जास्तच सक्रिय झालेल्या नगरसेवकांनी जे नैसर्गिक नाले गायब झाले आहेत, त्यांची यादीच वाचली. नाल्यांवर दिवसाढवळ्या अतिक्रमण केले जात आहे. भविष्यात याचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साऱ्यांचे म्हणणे ऐकत लवकरच कारवाई करू म्हणत नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

नेमके प्रकरण काय?

महापालिकेची शेवटची प्रभागसभा शुक्रवारी सातपूरमध्ये झाली. योगेश शेवरे या सभेचे अध्यक्ष होते. या सभेत त्र्यंबक रस्त्यालगत असलेला समृद्धीनगर येथील नैसर्गिक नाला बुजवून त्या ठिकाणी पक्के बांधकाम केल्याचा विषय निघाला. या ठिकाणी असे बांधकाम करायला परवानगी मिळतेच कशी, असा सवा नगरसेवक सलीम शेख यांनी उपस्थित केला. त्यांना नगरसेविका दीक्षा लोंढे, नयना गांगुर्डे, अलका अहिरे, सीमा निगम, इंदुबाई नागरे यांनीही हरकत घेतली. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही शेवटची सभा आहे. तुम्हीच निवडणूक या, असा आशावाद व्यक्त करत संतापलेल्या नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

अनेक वर्षांपासून विषय चर्चेत

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक नाल्यांचा विषय चर्चेत आहे. यातले अनेक नाले विकासकांनी गिळंकृत करून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. काही ठिकाणी नाले बळकावण्याचे आणि बुजविण्याचे षढयंत्र सुरू आहे. महापालिकेने यातले 63 नाले सप्टेंबर महिन्यात शोधून काढले आहेत. याचेही झाले असे की, या नाल्यांची महापालिकेच्या 2017 मध्ये केलेल्या शहर विकास आराखड्यात नोंद आहे. ज्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे, त्यांचा शोध केला. त्यात या न्याल्यांचा शोध लागला.

महापालिकेचे गांधी भवन नाल्यावरच

तळे राखणारा पाणी चाखणार या म्हणीप्रमाणे महापालिकेचे राजीव गांधी भवनच हे चक्क नाल्यावर बांधले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात महापालिकेसमोर तळे साचते. सोबतच पालिकेनेच नाळा बळकावल्याने ती इतरांना काय सांगणार आणि काय कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेपासून फर्लांगभर असलेल्या पोलीस अकादमीजवळून गेलेला नालाही गायब झाला आहे. हा नाला विसे मळ्यातून गंगापूर रोडकडे जायचा. मात्र, तो सुद्धा शोधण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. नाशकातील चोपडा नाला, सरस्वती नाला, वाघाडी नाल्यासह अनेक नाले बुजवले गेलेत. सिडकोतूनही अनेक नाले गायब झाल्याचे समजते.

सर्व काही संगनमताने

नाशकात यापूर्वी कितीही पाऊस झाला, तर पाणी तुंबत नसे. मात्र, शहरीकरणाने वेग घेतला. विकासकांचा सुळसुळाट सुरू झाला. त्यानंतर महापालिका नगररचना विभागाच्या आशीर्वादाने विकासकांनी मलईदार जागेसाठी फिल्डिंग लावत चक्क नाले बुजवून इमारती उभारल्या. याचा व्हायचा तो परिणाम झालाच. 2008 मध्ये नाशकाला पुराचा वेढा पडला. अगोदर अनेक ठिकाणी अरूंद झालेली गोदामाय आणि त्यात बळकावलेल्या नाल्यावर उभारलेल्या इमारतीने अख्ख्या नाशकाचे तळे झाले. आता थोडाही जास्तीचा पाऊस आला, तर थेट महापालिकेपासून ते शहरातील कित्येक भागात तळे साचते.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.