नाशिकच्या पाणी कपातीचं ‘मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी हेरलं, एप्रिलपासून राज्यभरात होणार अंमलबजावणी, निर्णय काय?
नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पाणी कपातीच्याबाबत बैठक घेत एक निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आल्यानंतर कौतुक होत आहे.
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिकमधील पाण्याच्या संदर्भात बैठक घेतली होती. नाशिक शहरामध्ये पाणी कपात करायची की नाही याबाबत जी बैठक घेणेत आली त्यामध्ये एक विशेष धोरण ठरविण्यात आले. हे धोरण ठरवत असताना नाशिक शहरांमध्ये पाणी कपातीचा निर्णय लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेला पाणी कपातीचा प्रस्ताव पाहून राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी कौतुक केले आहे. नाशिकच्या पाणी कपातीचे हे मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहे.
काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदाचा वर्षाचा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे प्रशांत महासागरामधील अल निनो या वादळचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाऊस उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
खरंतर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे. तरी देखील नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून नुकतीच एक बैठक झाली होती. त्यामध्ये पाणी कपातीचे मॉडेल तयार करण्यात आले असून ट्याची अंमलबजावणी ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
नाशिक महानगर पालिकेतील पाणी साठा बघता जुलै अखेर पर्यन्त पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे पाणीसाठा पुरेसा शिल्लक असतांनाही पुढील काळात तुटवडा जाणवू नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज असल्याने एप्रिल महिण्यात आठवड्यातील एक दिवस, मे महिण्यात आठवड्यातील दोन दिवस आणि जून महिण्यात आठवड्यातील तीन दिवस पाणी सोडले जाणार नाहीये.
जो पर्यन्त मुसळधार पाऊस सुरू होत नाही. धरणसाठयात पाण्याची पातळी जो पर्यन्त वाढत नाही तो पर्यन्त ही अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी हा प्रस्ताव पाहून नाशिक महानगर पालिकेच्या मॉडेलचे कौतुक करण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण राज्यात अशी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे का? याबाबत चाचपणी करून राज्यात पहिल्या आठवड्यात अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहे.
यंदाच्या वर्षी मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने त्याबाबत नियोजन ठिकठिकाणी केले जात आहे. संपूर्ण राज्यातील महत्वाच्या शहरातील पाणी साठयाचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.