AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार ढसाढसा रडला… ‘त्यांच्या’ हातून मरण्यापेक्षा मी जीवन संपवेल… धमकी आलेल्या आमदाराची उद्विग्न प्रतिक्रिया…

आमदार हिरामण खोसकर यांनी रडत रडत धमकी कशी आणि का दिली हे सांगितले आहे. यावेळी त्यांनी थेट आत्महत्या करून घेईल असेही म्हंटले आहे.

आमदार ढसाढसा रडला... 'त्यांच्या' हातून मरण्यापेक्षा मी जीवन संपवेल... धमकी आलेल्या आमदाराची उद्विग्न प्रतिक्रिया...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 11:30 AM

नाशिक : राज्यातील खासदार, आमदार यांना धमकीचे सत्र सुरूच आहे. या ना त्या कारणाने धमकी दिली जात असल्याचे समोर आले आहे. नुकतीच नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरुन धमकी आल्याचे समोर आले आहे. बाजार समितीत प्रचार विरोधात केल्याच्या रागातून हिरामण खोसकर यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे. दोन कोटी खर्च करून तुला निवडणुकीत पाडेल अशी धमकी देत तुला बघतो अशी धमकी दिल्याचे आमदार खोसकर यांनी म्हंटलं आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांनी धमकी दिल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी दिला आहे.

हिरामण खोसकर म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडीचे काम करण्याचे वरुण आदेश आले आहे. मी आमदार असल्याने मी प्रमुख आहे. त्यामुळे मला काम करावे लागणार आहे. याशिवाय देविदास पिंगळे माजी खासदार आहे त्यांचे काम मी आमदार नव्हतो तेव्हापासून करत आलो आहे.

मी माझं काम करतो आहे. शिवाजी चुंभळे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य चुंभळे यांनी मला 10 वेळेस फोन केले आहे. मला धमक्या दिल्या. देविदास पिंगळे यांचे काम करू नको, त्यांच्या व्यासपिठावर जाऊ नको म्हणून सांगितले, नाहीतर पाहून घेईल असा फोन आला होता.

हे सुद्धा वाचा

त्यांचे वारंवार फोन येत असल्याने मी त्यांना ब्लॉक केले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या नंबर वरुण मला फोन केला आणि ब्लॉक केले म्हणून सांगत आमच्या नादाला लागू नको, महागात पडेल अशी धमकी दिली. पैसे लावून तुम्हाला निवडणुकीत पाडू असं म्हणतात असाही आरोप खोसकर यांनी केला आहे.

बघून घेऊ अस म्हणत धमकी देतात. मला शेती पोती आहे. मला इलेक्शन नाही करायचे, मी शेती करेल. पण पैसे वाल्यानी कशीही दादागिरी करायची हे चुकीचे आहे. यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या करून घेईल अशी रडत रडत प्रतिक्रिया खोसकर यांनी दिली आहे.

हिरामण खोसकर यांनी गरिबाने राजकारण करायचं नाही का ? असे म्हणत उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. हिरामण खोसकर यांनी केलेल्या या आरोपावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

हिरामण खोसकर हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार आहे. ते सध्या माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या पॅनलचे काम करत आहे. त्यावरूनच हे संपूर्ण प्रकरण घडले असून पुढील काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.