Nashik| अजब तुझे सरकार…अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली…!
नाशिकमध्ये एका विस्तार अधिकाऱ्याने मृत ग्रामसेवकाच्या पेन्शमधून 28 लाखांची वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवला. बरं पेश्नमधून इतकी वसुली झाली, तर मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबाचा उदरर्निवाह होणार कसा, याचा थोडाही विचार या अधिकाऱ्यांनी करू नये, हे अवघडय.
नाशिकः अजब तुझे सरकार…अशी म्हणायची पाळी आता आलीय. होय, आपल्या इथे काहीही होऊ शकते. मृत व्यक्ती कागदोपत्री जिवंत दाखवल्याचे आणि जिवंत व्यक्ती कागदोपत्री मृत दाखवल्याचे ढिगाने उदाहरणे सापडतील. याचा त्रास संबंधित कुटुंबांना होतो. अशा उठाठेवी करणारे बहुतांश जण कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. सापडले, तर सहीसलामत बाहेर निघतात. नाशिकमध्ये अशीच काहीशी विचित्र घटना घडली. इथे एका विस्तार अधिकाऱ्यानेच चक्क मृत ग्रामसेवकाच्या नावावर एक-दोन नव्हे, तर चक्क 28 लाखांची वसुली लावली. नेमके प्रकरण काय, सविस्तर जाणून घ्या.
अशी केली उठाठेव
ग्रामसेवक राधेश्याम तात्याराव खोपे यांचा जानेवारी 2021 मध्ये आजारपणात मृत्यू झाला. त्यांच्या ग्रामपंचायत अंतर्गत कामाचे दफ्तर मिळाले नाही. त्यामुळे तब्बल 28 लाखांचा हिशेब लागत नव्हता. हे सारे पाहता विस्तार अधिकाऱ्याने वेगळेच डोके चालवले. त्यांनी हे दफ्तर शोधण्याची तसदी तर घेतलीच नाही. शिवाय पैसे कुठे खर्च झाले, याचा शोध घेणेही सोडले आणि चक्क मृत ग्रामसेवकाच्या पेन्शमधून 28 लाखांची वसुली करण्याचा प्रस्ताव ठेवला. बरं पेश्नमधून इतकी वसुली झाली, तर मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबाचा उदरर्निवाह होणार कसा, याचा थोडाही विचार या अधिकाऱ्यांनी करू नये, हे अवघडय. त्यामुळे या अजब वसुलीची जिल्ह्यात आणि विशेषतः कर्मचारी वर्गामध्ये मोठी चर्चा झाली.
अन् वसुली रद्द झाली
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामसेवकांची पेन्शन प्रकरणे अंतिम करण्याची सूचना दिली. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिंडोरी येथे बैठक घेतली. त्यांनी इतर ग्रामसेवकांची मदत घेतली. या 28 लाखाच्या कारवाईचे नेमके कारण काय, याचा तपास केला. तेव्हा ही कामे मेजरमेंट पुस्तकाच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायतीत झाल्याचे समोर आले. त्यामुळे ही 28 लाखांची वसुली रद्द करण्यात आली.
14 ग्रामसेवकांचा मृत्यू
महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या पेन्शन अदालत घेणार आहेत. त्यात जिल्ह्यातील 14 मृत ग्रामसेवकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामपंचायत विभागाच्या एकूण 40 पेन्शन तक्रारी आहेत. त्यात 11 प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. जानेवारी महिन्यात 14 पैकी किमान 10 ग्रामसेवकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
इतर बातम्याः
Nashik|पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?