नाशिकच्या तणावाच्या घटनेनंतर राज्यात कुठे काय आहे परिस्थिती?

Crime news: रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या एकूण 47 जणांवर अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर काल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आला होता.

नाशिकच्या तणावाच्या घटनेनंतर राज्यात कुठे काय आहे परिस्थिती?
नाशिकमध्ये तणावानंतर आज कावाड यात्रा निघाली.
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 11:30 AM

बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषधार्थ नाशिकमध्ये निघालेल्या मोर्च्याला शुक्रवारी हिंसक वळण लागले. दोन गटात दगडफेक झाली. त्यात काही जण जखमी झाले. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जमावबंदीचा आदेश लागू करावा लागला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये शांतता आहे. पोलीस बंदोबस्त अजूनही तैनात आहे. त्यानंतर संभाजीनगरमध्येही तणाव निर्माण झाला होता. संभाजीनगर व नाशिकमधील दोन गटात तणाव वाढल्यामुळे महाराष्ट्रात पोलीस सतर्क झाले आहेत. राज्यातील संवेदनशील भागांत दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

दंगल प्रकरणे 15 गुन्हे दाखल

नाशिकमध्ये 24 वर्षानंतर शुक्रवारी दंगल झाली. या वेळी झालेल्या दगडफेकीत 11 जखमी झाले. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. रबरी गोळ्यांचा वापर केला. या वेळी झालेल्या दगडफेकीत नऊ पोलीस कर्मचाऱ्यांचा दोन पोलीस उपायुक्त जखमी झाले. दंगल प्रकरणे 15 गुन्हे दाखल केले आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर पालकमंत्री दादा भुसे नाशिक दौऱ्यावर आले आहे. त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बाबत आज दीड वाजता बैठक बोलवली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमधील घटनेबाबत बोलताना डीसीपी किरणकुमार चव्हाण म्हणाले, शहरातील सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे. जनजीवन आता पूर्वपदावर आलेले आहे. आम्ही दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. हत्येचा प्रयत्न, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशी गंभीर स्वरुपाची कलमे लावण्यात आलेली आहेत. आतापर्यंत जवळपास १५ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अजूनही काही आरोपींना अटक होणार आहे. सिसिटीव्हीच्या माध्यमातून आरोपी शोधले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नये, यासंदर्भात काळजी घेतली जात आहे.

धुळ्यात आज बंद

बांगलादेश येथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात धुळ्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. नाशिक येथे बंद दरम्यान झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. ज्या मार्गावरुन सकल हिंदू समाजाचा मोर्चा जाईल त्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहे. धुळे शहरासह पिंपळनेर शिरपूर दोंडाईचा निजामपूर येथे देखील मोठा बंदोबस्त आहे. धुळे बंदच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंदोबस्त तैनात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील पटवर्धन चौकामध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांकडून पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी त्यासाठी हे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये गुन्हे दाखल

रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या एकूण 47 जणांवर अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर काल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आला होता. या मोर्चे दरम्यान आंदोलनकर्त्यांनी एक तास नगर – संभाजीनगर महामार्ग अडवला होता. विना परवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 47 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.