ऐतिहासिक ‘रामसेतू’वरून नाशिककर विरुद्ध प्रशासन आमने-सामने; पूल पाडण्याचे काय सांगितले कारण?
महापालिका असो वा स्मार्ट सिटी. ते भावनिक विषयांना खूप लवकर हात घालतात. त्यामुळे प्रकरण एक असते आणि वाद उद्भवतो वेगळा.
नाशिकः नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर ऐतिहासिक रामसेतू (Ramsetu) पुलावरून एक नवीनच वाद निर्माण झाला असून, त्यामुळे नाशिककर विरुद्ध स्मार्ट सिटी प्रशासन असा सामना रंगताना दिसतोय. नाशिकमध्ये स्मार्ट सिटीची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. त्याचा रोष प्रशासनाला पत्करावा लागतोयच. सोबतच प्रशासनाने आता पंचवटीतील ऐतिहासिक असा रामसेतू पूल पाडण्याची भूमिका घेतलीय. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून, त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. यापूर्वी नाशिकमधील उंटवाडी येथील अडीचशे वर्षे जुना वटवृक्ष उड्डाणपुलासाठी तोडण्याचा निर्णय झाला होता. यालाही नाशिककरांनी रस्त्यावरून उतरून विरोध केला. याप्रकरणात थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातले. त्यांनी या झाडाला भेट दिली. हा पुरातन वटवृक्षत तोडणार नाही, असे आश्वासन दिले. महापालिका आयुक्तांना तशा सूचना दिल्या. त्यानंतर हे आंदोलन शमले आहे.
प्रशासन काय म्हणते?
गोदावरी तीरावर 60 वर्षांपूर्वी रामसेतू बांधला. मात्र, या भागात नेहमी गर्दी असते. कुंभमेळा, यात्रा यासाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावतात. मात्र, महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करून हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय. तो तसाच ठेवला, तर धोका उद्भभवू शकतो. तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे हा पूल पाडणे गरजेचे आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याला पर्याय काय?
महापालिका असो वा स्मार्ट सिटी. ते भावनिक विषयांना खूप लवकर हात घालतात. त्यामुळे प्रकरण एक असते आणि वाद उद्भवतो वेगळा. सध्या येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. याचा लाभ उठवण्यासाठी राजकीय पक्ष सरसावरणारच. त्यामुळे याबद्दल एखादे रितसर आवाहन करून किंवा माध्यमांमध्ये असा निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू मांडली असती, तर नागरिकही आक्रमक झाले नसते. शिवाय अनेकदा नागरिक आणि प्रशासन यांच्यात काही दुवा आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. हे पाहता प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालीय.
इतर बातम्याः