नाशिकची विद्यार्थिनी अखेर मायदेशी; अजून 8 जण युक्रेनमध्ये अडकले!

नाशिक जिल्ह्यातील 8 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाल्याचे वृत्त आहे. यातल्या अनेकांची नावे ही विमान प्रवाशांच्या यादीत आहेत. येत्या दोन दिवसांंत हे विद्यार्थी मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

नाशिकची विद्यार्थिनी अखेर मायदेशी; अजून 8 जण युक्रेनमध्ये अडकले!
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 9:20 AM

नाशिकः रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाने (War) जग हादरून गेले आहे. या वणव्यात अनेक भारतीय (Indian) होरपळून निघतायत. अखेर या संकटातून नाशिकची एक विद्यार्थिनी सहिसलामत सुटून मायदेशी परतली आहे. रिद्धी शर्मा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नाशिकच्या मखमलाबाद परिसरात रहाते. रिद्धी ही पहिल्या विमानाने भारतात पोहचलीय. कदाचित आज ती नाशिकमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. मात्र, अजून जिल्ह्यातील 8 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाल्याचे वृत्त आहे.

उर्वरित विद्यार्थी कधी येणार?

नाशिक जिल्ह्यातील उर्वरित विद्यार्थी येत्या दोन दिवसांमध्ये युक्रेनमधून भारतात परतणार असल्याची शक्यता आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची नावे विमान प्रवाशांच्या यादीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तूर्तास तरी दिलासा मिळालाय. मात्र, हे विद्यार्थी मायदेशी परतल्यानंतरच त्यांची चिंता थांबणार आहे. नाशिकची आदिती देशमुखआणि प्रतीक जोंधळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. खर्कीव्ह प्रांतातील हॉस्टेलमध्ये ते राहतात. त्यांच्यासोबत इतरही भारतीय विद्यार्थी आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केल्याने या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर तिथून अनेकांची सुटका झाल्याचे समजते.

विद्यार्थ्यांसाठी सूचना काय?

भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी काही सूचना दिल्यात. त्यांच्या मायदेशी परतण्याची लवकरच सोय करण्यात येणार आहे. त्यांनी पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय भारतीय दूतावासाची अधिकृत संकेतस्थळे, सोशल मीडिया हँडल पाहावीत. सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घ्यावी असे आवाहन केले.

हेल्पाइन क्रमांक सुरू

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि नागरिकांसाटी परराष्ट्र मंत्रालय आणि नाशिक जिल्ह्याधिकारी कार्यालयानेही हेल्पलाइन तयार केली आहे. कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक 0253- 2317151 या दूरध्वनी क्रमांकावर टोल फ्री. क्रमांक 1077 आणि ddmanashik@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. सर्व हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत…

भारतीय दूतावासाची युक्रेनमधील हेल्पलाइन

+38 0997300483

+38 0997300428

+38 0933980327

+38 0625917881

+38 0935046170

पररराष्ट्र मंत्रालयाची भारतातील हेल्पलाइन

01123012113

01123014104

01123017905

1800118797 (टोल फ्री)

011-23088124 (फॅक्स )

ई-मेल situationroom@mea.gov.in

नाशिकमधील हेल्पलाइन

0253- 2317151

1077 (टोल फ्री)

ई-मेल ddmanashik@gmail.com

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.