Nashik Teachers Constituency : तब्बल 24 तासांनी निकाल जाहीर; शिंदे की ठाकरे, कोणाची बाजी?

नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानी असून महाविकास आघडीचे संदिप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Nashik Teachers Constituency : तब्बल 24 तासांनी निकाल जाहीर; शिंदे की ठाकरे, कोणाची बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 7:40 AM

Nashik Teachers Constituency Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या 26 जूनला या चार जागांसाठी मतदान पार पडले. आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघडीचे संदिप गुळवे यांचा पराभव झाला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच आहे. पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सध्या सुरु आहे. या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. तर बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार बाद ठरवण्यात आले आहेत.

नाशिक शिक्षक मतदारसंघात विजयासाठी 31576 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे सध्या महायुतीचे किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मात्र महाविकासआघाडीचे गणित बिघडवल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

पाच मतपत्रिका जास्त

तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती.

नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. या चौरंगी लढतीत सध्या शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानी असून महाविकास आघडीचे संदिप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.