नाशिकः ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्ग टाकण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे रविवारी नाशिक रेल्वे मार्गावरच्या 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, अजून एसटी संप पुरता मिटता नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. विशेष म्हणजे एक जानेवारीपासून या मार्गावरच्या विविध गाड्या रेल्वेच्या कामासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हालच सुरूच आहेत.
या गाड्या धावणार नाहीत
नाशिक मार्गावर रविवारी मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई-नागपूर-सेवाग्राम एक्स्प्रेस अप-डाऊन, मुंबई-नांदेड-मुंबई एक्प्रेस, नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस अशा दहा गाड्या धावणार नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वी एक तारखेपासून नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 1 व 2 जानेवारी रोजी धावली नाही. जालना-मुंबई-जालना अप-डाऊन जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावली नाही. मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावली नाही. मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी 2 व 3 जानेवारी रोजी धावली नाही. नागपूर-मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी 1 व 2 जानेवारी रोजी धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंच हाल झालेले पाहायला मिळाले. नाशिक मार्गावरच्या अठरा रेल्वे येत्या 9 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कारण एकीकडे एसटी बंद आहेत. दुसरीकडे महत्त्वाच्या रेल्वे बंद झाल्याने प्रवास करायचा तरी करा, असा सवाल निर्माण होत आहे.
लोकल सुरू करण्याची मागणी
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. ही गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ही गाडी सुरू झाल्यास नाशिककरांना रोज मुंबईचा प्रवास सुकर होणार आहे.
Nashik Corona|धोका वाढला, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांच्याही पुढे!