Nashik Water|जुन्या नाशिकमध्ये आता 24 तास पाणीपुरवठा; काय आहे नेमकी योजना?

नाशिक-पंचवटी गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली योजना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या वर्षात स्काडा पद्धती आणण्यासाठी आयुक्तांनी पावले उचलली आहेत.

Nashik Water|जुन्या नाशिकमध्ये आता 24 तास पाणीपुरवठा; काय आहे नेमकी योजना?
Water connection
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 11:33 AM

नाशिकः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंददायी अशी बातमी आली आहे. आता नाशिक-पंचवटी गावठाणात 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी स्काडाचा प्रयोग करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतल्याचे समजते. लवकरच हे काम सुरू होणार आहे.

नेमकी काय आहे योजना?

नाशिकमध्ये पाण्याची काही कमतरता नाही. यंदा तर पावसाने कहर केला. अजूनपर्यंत त्याचे थैमान सुरू असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, इतके असूनही नाशिक-पंचवटीच्या गावठाण भागामध्ये म्हणजेच जुन्या नाशिकमध्ये नेहमी पाणी टंचाई जाणवते. त्याचे कारण म्हणजे इथे चोवीस तास पाणीपुरवठा होत नाही. हे पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव सक्रिय झाले आहेत. त्यांनी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडाचा प्रयोग राबविण्याची निर्णय घेतल्याचे समजते. या प्रयोगाने गावठाणात पाणी मोजणीचा मार्गही मोकळा होणार आहे.

मोजून देणार पाणी

नाशिक-पंचवटी गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली योजना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या वर्षात स्काडा पद्धती आणण्यासाठी आयुक्तांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे धरणातून थेट पाण्याच्या टाकीपर्यंत जाणाऱ्या पाण्याची मोजणी करणे सोपे होणार आहे. खरेतर पाण्याची अचूक मोजणी करण्यासाठी म्हणूनच स्काडा सिस्टीमसाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढली. मात्र, त्यातील अटी, शर्थीत अनेक बदल झाले. हे सारे संशयास्पद वाटल्याने त्या निविदा रद्द करण्यात आल्या. आता त्यानंतर पुन्हा एकदा स्काडा सिस्टीम राबवण्यात येणार आहे. त्याचा फायदा नाशिक आणि पंचवटी गावठाणाला होऊन तिथे चोवीस तास पाणी मिळेल.

निवडणुकीच्या तोंडावर दिलासा

नाशिक महापालिकेची निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधक शिवसेनेने कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर जुन्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना चोवीस तास पाणीपुरवठा मिळणार असल्याने त्यांची प्रत्येक निवडणुकीपूर्वी होणारी मागणी पूर्ण होणार आहे. शिवाय ज्यांच्या घरांपर्यंत पाणीपुरवठा नाही, त्यांना नळ जोडणी घेणेही आता सुकर होणार आहे. नवीन वर्षात महापालिकेने नागरिकांना ही अतिशय महत्त्वाची भेट दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद आहे.

इतर बातम्याः

Nashik Crime: फीचे पैसे हरवल्याने मानसिक तणावातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, नाशिकमधील खळबळजनक घटना

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

Health University Admission|आरोग्य विद्यापीठाच्या क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.