चाळणी झालेल्या नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा दंडासह 26 कोटी 34 लाख वसूल करणार

चाळणी झालेल्या नाशिक-मुंबई महामार्गाची येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा, अन्यथा दंडाच्या पाच कोटी रकमेसह टोल कंपनीच्या खात्यातील 26 कोटी 34 लाखांची रक्कम काढून घेण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय महामार्गाच्या तांत्रिक विभागाचे प्रबंधक बी. एम. साळुंके यांनी दिला आहे.

चाळणी झालेल्या नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा दंडासह 26 कोटी 34 लाख वसूल करणार
नाशिक-मुंबई महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली आहे.
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:43 PM

नाशिकः चाळणी झालेल्या नाशिक-मुंबई महामार्गाची (Nashik-Mumbai highway) येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा, अन्यथा दंडाच्या पाच कोटी रकमेसह टोल कंपनीच्या खात्यातील 26 कोटी 34 लाखांची रक्कम काढून घेण्यात येईल. या रकमेतून या मार्गाची दुरुस्ती करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय महामार्गाच्या तांत्रिक विभागाचे प्रबंधक बी. एम. साळुंके यांनी दिला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. टोल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गाची दुरवस्था झाल्याचा ठपका महामार्ग प्राधिकरणाने ठेवला आहे. विशेषतः घोटी, इगतपुरी, कसारा दरम्यान या मार्गाची अक्षरशः अनेक ठिकाणी चाळणी झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या राज ठाकरे यांनीही या मार्गाच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत टोल प्रशासनाने अनेकदा मार्गाच्या दुरुस्तीचे आदेश दिले, नोटीस दिली. मात्र, कंपनीने आपलेच घोडे दामटले. शेवटी काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी या कामाची पाहणी केली आणि या मार्गाच्या दुरुस्तीची पुन्हा मागणी केली. या मागणीची राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली आहे. येत्या पंधरा दिवसांत या मार्गाची शंभर टक्के दुरुस्ती करा, अन्यथा दंडासह 26 कोटी 34 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या रकमेतून महामार्गाची वसुली करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

भुजबळांनीही दिले होते दुरुस्तीचे आदेश

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही यापूर्वी दिले होते. भुजबळांच्या उपस्थितीमध्ये वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल नाका परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी बैठक झाली होती. यावेळी भुजबळ यांच्यासमोर नाशिक-मुंबई कामाचा विषय आला होता. राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील रस्ते निकृष्ट असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची काम पूर्ण करावेत, टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केले नाही आणि १५ ऑक्टोबर पर्यंत नाशिक – मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती झाली नाही, तर संबधित यंत्रणेवर कारवाई करू, असा इशारा भुजबळ यांनी दिला होता. (15 days for repair of Nashik-Mumbai highway; Otherwise, he will recover Rs 26 crore 34 lakh with penalty)

इतर बातम्याः

नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल

चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; नाशिकजवळची औंढेवाडी हादरली, एक आरोपी अल्पवयीन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.