6 कोटींची उलाढाल ठप्प; नाशिकमध्ये महापुराच्या भीतीनं सराफा बंद

गेल्या दोन दिवसांपासून धरण परिसरात सुरू असलेला तुफान पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे नाशिकमध्ये (Nashik) महापूर (flood) येणार अशी भीती असल्याने बहुतांश सराफा बाजार (bullion market) बंद राहिला.

6 कोटींची उलाढाल ठप्प; नाशिकमध्ये महापुराच्या भीतीनं सराफा बंद
नाशिकमध्ये महापुराच्या भीतीने सराफा बाजारातील अनेक दुकाने बुधवारी बंद ठेवली होती.
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 10:39 AM

नाशिकः गेल्या दोन दिवसांपासून धरण परिसरात सुरू असलेला तुफान पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे नाशिकमध्ये (Nashik) महापूर (flood) येणार अशी भीती असल्याने दिवसभर बहुतांश सराफा बाजार (bullion market) बंद राहिला. त्यामुळे जवळपास 6 कोटींची उलाढाल ठप्प झाली.

नाशिकमध्ये सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महिनाभरात चक्क गोदावरीला चारवेळेस पूर आला. 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. सोमवारी (27 सप्टेंबर) पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून, तो 15000 क्यूसेक पेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यामुळे सराफा बाजारातील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानातील मोलाचा ऐवज स्थलांतरित केला. गोदावरीला बुधवारी दुपारी महिन्यातला चौथा पूर आला. दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला. पूर वाढण्याची भीती सराफा व्यापाऱ्यांच्या मनात होती. त्यामुळे दिवसभर सराफा बाजार ठप्प होता. आम्ही दुपारीच दुकानांमधील सामानांची आवराआवर केली होती, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिशनचे अध्यक्ष गिरीश नेवासे यांनी दिली.

नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाणी सोडणार असल्याचे कळाले होते. त्यामुळे गोदावरीला मोठा पूर येण्याची भीती होती. हे पाहता आम्ही सकाळीच दुकानाची आवराआवर करायला घेतली होती. काही दागिने सुरक्षित स्थळी नेले होते. – चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र

गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू होता. गोदावरीला सोमवारीच पूर आला होता. बुधवारी जास्त पाणी सोडणार येणार असल्याचे समजले होते. त्यामुळे आम्ही दक्ष होतो. पूर येण्याच्या भीतीन दुकानातली आवराआवर केली होती. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन (6 crore turnover stalled; Bullion closed in Nashik due to fear of floods)

इतर बातम्याः

अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणाला नाट्यमय कलाटणी, निकाळजे म्हणतात, कांदेंवर दावा ठोकणार

नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.