सिन्नरमध्ये पुन्हा 207 कोरोना रुग्ण; निफाडही हॉटस्पॉट, नाशिक जिल्ह्यात 973 जणांवर उपचार सुरू

नाशिक जिल्ह्यातले सिन्नर आणि निफाड अजूनही हॉटस्पॉट ठरत आहे. सिन्नरमध्ये 207 आणि निफाडमध्ये पुन्हा 107 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण 973 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिन्नरमध्ये पुन्हा 207 कोरोना रुग्ण; निफाडही हॉटस्पॉट, नाशिक जिल्ह्यात 973 जणांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 12:06 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातले सिन्नर आणि निफाड अजूनही हॉटस्पॉट ठरत आहे. सिन्नरमध्ये 207 आणि निफाडमध्ये पुन्हा 107 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण 973 रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 109 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 973 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिकमध्ये 64, बागलाण 10, चांदवड 25, देवळा 16, दिंडोरी 41, इगतपुरी 7, कळवण 13, मालेगाव 15, नांदगाव 11, निफाड 114, पेठ 1, सिन्नर 207, त्र्यंबकेश्वर 7, येवला 108 अशा एकूण 639 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३००, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २४ तर जिल्ह्याबाहेरील १० रुग्ण असून, एकूण ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 721 रुग्ण आढळून आले आहेत.

नवरात्रोत्सवात कोरोना नियम कडक

कोरोना काळातही वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

म्हणून खरबदारी घेणे सुरू

नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. एकीकडे सरकारने शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोना शून्यावर जायला तयार नाही. कोरोना नियमांचे पालन सध्या कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. हे पाहता नवरात्रोत्सवात कडक खबरदारी घेणे सुरू आहे.

सिन्नरमध्ये 207 आणि निफाडमध्ये पुन्हा 107 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण 973 रुग्णांवर उपचार सुरू आहे. – डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

इतर बातम्याः

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

घातवारः बारा वर्षांच्या मुलासह दोन तरुण गोदावरीत बुडाले; नाशिकमधल्या घटनेने हळहळ

(973 corona patients undergoing treatment in Nashik; 207 in Sinnar alone)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.