AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अद्वय हिरे यांना ठाकरे गटाचे उपनेतेपद; पहिली प्रतिक्रिया नेमकी काय?

मी ग्रामीण भागातून आलेला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. ठाकरे गटाने ही संधी देणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गट पहिल्या क्रमांकाचे पक्ष कसा होईल, यासाठी प्रयत्न करेन.

अद्वय हिरे यांना ठाकरे गटाचे उपनेतेपद; पहिली प्रतिक्रिया नेमकी काय?
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 9:28 AM

नाशिक : उद्धव सेनेच्या उपनेतेपदी अद्वय हिरे यांची वर्णी लागली. उपनेते पद मिळाल्यानंतर अद्वय हिरे यांचा नाशिक जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला. उपनेतेपदी अद्वय हिरे यांची नेमणूक झाल्यानंतर मालेगावात मोठ्या जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने ढोल ताशे वाजवत, मिरवणूक काढत स्वागत केले. मंत्री दादा भुसे यांना सह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती असल्याचे बोलले जाते. पालकमंत्री यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी ही रणनीती आखली. 26 तारखेला होणाऱ्या सभेच्या पार्श्भूमीवर मालेगावात जोरदार प्रचार सुरू आहे. उपनेतेपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा बोलताना अद्वय हिरे यांनी ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांचे अभिनंतर केले. अद्वय हिरे म्हणाले, मी ग्रामीण भागातून आलेला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. ठाकरे गटाने ही संधी देणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गट पहिल्या क्रमांकाचे पक्ष कसा होईल, यासाठी प्रयत्न करेन.

उद्धव ठाकरे यांची सभा राज्यपातळीवरची

कोकणात गावांची संख्या खूप लहान आहे. गावं विखुरलेली आहेत. तालुक्यांची संख्या छोटी आहे. दोन जिल्हे मिळून एक लोकसभा क्षेत्र आहे. खेडची सभा मोठी झाली. मालेगाव येथील २६ तारखेची सभा त्यापेक्षा मोठी होईल. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा होताना दिसेल, असा विश्वास अद्वय हिरे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा होत आहे. याबाबात बोलताना अद्वय हिरे म्हणाले, उद्धव ठाकरे सभा घेतात तेव्हा ती एका माणसापूरती मर्यादित नसते. उद्धव ठाकरे यांची सभा ही राज्यपातळीवरची असते. राज्यातील इतर विरोधी पक्षांनाही आवाहन करू. एखाद्या आमदारावर उद्धव ठाकरे यांनी बोलावं येवढे ते मोठे नाहीत. त्यासाठी माझ्यासारखे कार्यकर्ते सक्षम आहेत.

हे सुद्धा वाचा

लोकसभा, विधानसभेतील चित्र असं असेल

संघर्ष यात्रा सुरू झाली आहे. खेडनंतर मालेगावात सभा होत आहे. यापुढं सभा एकट्या ठाकरे गटाच्या न होता महाविकास आघाडीच्या व्हाव्यात, अशी चर्चा झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व सभा या महाविकास आघाडीच्या माध्यमातून होताना दिसतील. तरी प्रत्येक विभागात संघर्ष यात्रेची एकतरी सभा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेऊ. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती दिसते. त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभेत ४० प्लस आणि विधानसभेत २०० हून अधिक जागा घेताना दिसेल, असं चित्र महाराष्ट्रात असल्याचंही अद्वय हिरे यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.