Amit Thackeray| सिन्नरमध्ये मनसैनिकांनी टोलनाका फो़डला, रात्रीच्या राड्यावर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Amit Thackeray| अमित ठाकरे नाशिक-नगर दौऱ्यावर असताना जोरदार राडा झाला आहे. अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला असं मनसैनिकांच म्हणणं आहे. मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते.

Amit Thackeray| सिन्नरमध्ये मनसैनिकांनी टोलनाका फो़डला, रात्रीच्या राड्यावर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
amit thackeray son of raj thackeray mns workers Vandalise sinnar toll plaza in nashik
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 2:49 PM

सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या नाशिक-नगर दौऱ्यावर आहेत. पक्ष, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा आहे. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला. टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोल नाकाच फोडला.

मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास तिष्ठत ठेवल्याचा आरोप होतोय. नाशिक-नगर दौऱ्यात अमित ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटून त्यांची मत, विचार जाणून घेत आहेत. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्याला प्रतिसादही चांगला मिळतोय.

कुठला टोलनाका होता?

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला. अमित ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे.

अमित ठाकरे यांची काय प्रतिक्रिया?

या वादावर आता अमित ठाकरे यांची बाजू समोर आली आहे. “टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘माझ्यामुळे आणखी एक वाढला’

“मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला” असं अमित ठाकरे म्हणाले. काल रात्री 9 वाजता हा राडा झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मनसैनिकांचं हे आक्रमक रुप पाहून टोलनाक्यावरील कर्मचारी पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणले.

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.