प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

कोरोनाचे अंधार जाळे फिटून आकाश मोकळे झाले आहे. शाळांमधल्या वर्गावर्गातून ज्ञानाचा प्रकाश आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रात सुरू झाला. विभागात एकूण 5210 शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत प्रवोशोत्सव सोहळा रंगला.

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 11:04 AM

नाशिकः कोरोनाचे अंधार जाळे फिटून आकाश मोकळे झाले आहे. शाळांमधल्या वर्गावर्गातून ज्ञानाचा प्रकाश आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट सोमवारपासून उत्तर महाराष्ट्रात सुरू झाला. विभागात एकूण 5210 शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत प्रवोशोत्सव सोहळा रंगला.

नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक शहरात 227, तर जिल्ह्यात 2802 अशा एकूण 3029 ठिकाणी ज्ञानमंदिरे आजपासून उघडली. त्यात नाशिक शहरात 8 वी ते 12 च्या 227 शाळा आहेत. तर जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या 2802 शाळांचा समावेश आहे. यासाठी शाळांना भल्या मोठ्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याही नाशिक जिल्ह्यात जवळपास 618 माध्यमिक शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 1 लाख 7 हजार 285 आहेत. मात्र, प्रत्यक्षात 62 हजारांच्या जवळपास विद्यार्थीच शाळेत येत आहेत. अनेक पालक अजूनही कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. सरकारने यापूर्वी ज्या शाळा सुरू केल्या तिथे सॅनिटायझेशन आणि प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यासाठी निधीची तरतूद केली नव्हती. आता हा निधी मिळणार असल्याचे समजते.

जळगावमध्ये 924 शाळा सुरू

जळगाव जिल्ह्यातही सोमवारपासून मोठ्या उत्साहात शाळांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे गुरुजींनी उत्साहाने स्वागत केले. शहरी भागातील 285 आणि ग्रामीण भागातील 638 अशा एकूण 923 शाळा आजपासून सुरू झाल्या. यात शहरी भागांमधील शाळेत 142177 विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागांमधील शाळेत 270400 विद्यार्थी आहेत.

धुळ्यात 447 शाळा सुरू

धुळे जिल्हात आजपासून जवळपास 447 शाळा सुरू झाल्या. त्यामुळे गावागावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाळांचा परिसर झाडून चकाचक करण्यात आला आहे. शाळांमध्ये अक्षरशः प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी गेल्या दोन दिवसांपासून जोरदार तयारी केली होती.

नंदुरबार जिल्ह्यात 810 शाळा सुरू  नंदुरबार जिल्ह्यात 810 शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यात 78118 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या नियमानुसार एका बाकावर एकच विद्यार्थी बसवला जाणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

20 टक्के शिक्षकांचे लसीकरण कधी होणार?

राज्य सरकारने एकीकडे शाळा सुरू केल्या. मात्र, नाशिक जिल्ह्यातील 20 टक्के शिक्षकांनी अजूनही कोरोना लस घेतलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊन मुलांमध्ये कोरोना पसरल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांमधून होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना 5 सप्टेंबरपर्यंत लस घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक शिक्षकांनी लस घेतली नसल्याचे समजते. अनेकांनी लसीबाबतच्या गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. काही जणांनी काहीही कारण नसताना चालढकलपणा केला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे किती शिक्षकांनी लस घेतली याची निश्चित आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही.

हे भलते अवघड

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळतो आहे. सिन्नर, निफाडमध्ये सातत्याने रुग्ण आढळत आहेत. अशातही जिल्ह्यातले अनेकजण साधा मास्कही वापरत नाहीत. कोरोनाच्या नियमावलीकडे पाठ फिरवली गेली आहे. जुन्या नाशिकमधील पंचवटी, रामकुंड परिसरात बाजार असो, की इतर ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. शालिमार, अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह संपूर्ण शहरातही हीच परिस्थिती आहे.

इतर बातम्याः

सरकारी कचेऱ्या होणार टकाटक; नाशिकमध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान सुरू

पुणे बॉईज स्पोर्टस संस्थेत प्रवेश घेण्यासाठी 4 ऑक्टोबरपासून क्रीडा चाचण्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.