माफ करा… अजितदादांनी भरसभेत मागितली माफी; नेमकं काय घडलं?
जर्मनीत चार लाख मुलं कामासाठी हवे आहेत. दोन लाख रुपये महिना आहे. माहिती घ्या. कोर्सेस करा आणि परदेशात नोकरी करा, असं सांगतानाच टोयोटाचा कारखाना आपण संभाजी नगरमध्ये तयार करणार आहोत. जिंदाल कारखाना कोकणात आला. भाषण केल्याने रोजगार मिळणार नाही. माझ्याकडे सांगायला खूप काम आहे. उगाच गुलाबी गाडीत बसून गुलाबी स्वप्न दाखवत नाही. मी शब्दाचा पक्का आहे, असं अजित पवार म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा अवाका आणि त्यांचा दरारा पाहून प्रशासनातील भले भले अधिकारी त्यांना घाबरतात. त्यांचा अभ्यास आणि विषयाची जाण यामुळे अनेकांची बोलती बंद होते. शिवाय अजितदादा स्पष्टवक्ते आहेत. तिथल्या तिथेच जे काही आहे ते बोलून मोकळे होतात. त्यामुळे अनेकजण त्यांना वचकून असतात. पण एवढ्या स्पष्टवक्त्या अजितदादांना चक्क माफी मागायची वेळ आली आहे. त्यांनी भर सभेत आज जाहीर दिलगिरी व्यक्त केली. पण ती कोणत्या चुकीमुळे नाही, तर वेगळ्याच कारणाने….
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा नाशिकला पोहोचली आहे. नाशिकमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी चक्क जनतेची माफी मागितली. सरकार चालवताना काही चुका झाल्या. त्यामुळे लोकसभेत पराभव झाल्याने अजितदादा यांनी जनतेची माफी मागितली आहे. आपल्याला जो काही झ्टका लोकसभेला दिलाय, तो लैच जोरात लागलाय. माफ करा, जो काम करतो तोच चुकतो. पण आम्ही बोध घ्यायचा असतो, असं अजित पवार म्हणाले.
योजना आणत्या आल्या असत्या का?
मी सरकारमध्ये नसतो तर चांगल्या योजना देता आल्या असत्या का? मी जे काही केलं ते महाराष्ट्राच्या आणि राज्यातील जनतेच्या विकासासाठी केलं आहे. भावनिक होवू नका, आपल्याला राज्य कारभार चांगला करायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.
आम्हीही 65 वर्षाचे झालो
आम्ही विकासासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सरकारमध्ये नसतो तर आमच्या आमदारांना पैसे देता आले असते का? ज्या ज्या वेळेस जे करण गरजेचं होत ते मी केलं, कुणाला दुखावण्याचा प्रयत्न नव्हता, असं सांगतानाच आम्ही पण आता 65 वर्षांचे झालो आहोत. प्रशासनावर माझी चांगली पकड आहे. अधिकाऱ्यांकडून कसे काम करायचे हे मला माहिती आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मनात खंत होती
राज्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. जन सन्मान यात्रेची सुरुवात केली तेव्हापासून पाऊस पडत आहे. मात्र या पावसात देखील महिला स्वागत करत आहेत. मी कुठली गोष्ट देत असताना वेळ मारून नेण्यासाठी देत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे मी बघितले आहेत. आम्ही महिलांना आरक्षण दिलं. मात्र त्यांना सबळ करण महत्त्वाचं होतं. माझं कुटुंब सुखात राहील पाहिजे यासाठी माय माऊली स्वतःच्या पोटाला चिमटा घेत असते. ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या मी केल्या. मात्र माऊलीसाठी काही केलं पाहिजे अशी खंत होती, असं ते म्हणाले.