अंबड ट्रक टर्मिनलचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे ठाकरे, गडकरींना साकडे

औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरामध्ये नाशिकचा समावेश होतो. अजूनही इथल्या औद्योगिकीकरणात मोठी भर पडत आहे. त्यामुळे परिसरात ट्रक टर्मिनल असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.

अंबड ट्रक टर्मिनलचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे ठाकरे, गडकरींना साकडे
उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी.
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 7:05 AM

नाशिकः नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड एमआयडीसीतील प्रलंबित असलेला ट्रक टर्मिनिल तातडीने सुरू करावा. केंद्र व राज्य शासनाने वाहतुकदारांच्या समस्या लक्षात घेत याठिकाणी आरक्षित असलेल्या भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करावा, अशी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम सैनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना याबाबत साकडे घातले आहे.

काय आहे मागणी?

नाशिक महानगरपालिका हद्दीमधील सातपूर,अंबड एमआयडीसी असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. याठिकाणी ट्रक टर्मिनलची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहतात. त्यामुळे याठिकाणी अपघातही मोठ्या प्रमाणात होतात. तसेच गाड्या उभ्या करण्यास जागा नसल्याने वाहतूकदारांना अडचण निर्माण होऊन गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्यावर नाहक दंड भरावा लागत असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागतो. हे पाहता हा प्रलंबित टर्मिनल विकसित करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या व्यवस्था सुरू करा

औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरामध्ये नाशिकचा समावेश होतो. येथे अजूनही औद्योगिकीकरणात मोठी भर पडत आहे. त्यामुळे या परिसरात ट्रक टर्मिनल असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. ट्रकवरील चालक व क्लीनर हे बाहेर राज्यातील व अत्यंत गरीब परिस्थितीतील आहे. त्यामुळे ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी त्यांची राहण्याची, उपहारगृह, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह, वाहन दुरुस्तीसाठी गॅरेज, डिझेल पंप, वजन काटा, स्पेअर पार्ट दुकान, गोदाम, सर्विस स्टेशन, प्रशिक्षण हॉल, प्रथमोपचारसाठी व्यवस्था असावी, अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलबिंत आहे.  नाशिक शहरातील आरक्षित ट्रक टर्मिनल विकसित झाल्यास शहरावरील वाहतुकीचा ताण तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

उद्योजकांचेही साकडे

अंबड ट्रक टर्मिनल विकसित होणेबाबत संघटनेच्यावतीने यापूर्वी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत याठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्यासाठी कोणतेही सकारात्मक निर्णय झालेले नाही. यापूर्वी देखील संस्थेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने सदरबाबत आजपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. सदर विषय गेले अनेक वर्ष प्रलबिंत आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जागेत ट्रक टर्मिनलच उभे रहावे ही संघटनेची व उद्योजकांचीही मागणी आहे. त्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन तातडीने ट्रक टर्मिनल विकसित करावा, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी

Omicron cases: महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन परततोय, कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?; नव्या वर्षात बाहेर जाण्याचा विचार करताय तर हे नियम वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.