तुमचे कॅमेरे पोहोचतात, पण आमचे पोलीस पोहचत नाहीत; पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी महसूल मंत्री थोरातांचा आहेर

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवार देशातले जेष्ठ नेते आहेत. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सरकारने कायम सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कालची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

तुमचे कॅमेरे पोहोचतात, पण आमचे पोलीस पोहचत नाहीत; पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी महसूल मंत्री थोरातांचा आहेर
बाळासाहेब थोरातImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:03 PM

नाशिकः तुमचे कॅमेरे पोहोचतात, पण आमचे पोलीस पोहचत नाहीत, अशा शब्दांत शनिवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गृहखात्याला लक्ष करत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आरसा दाखवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर शुक्रवारी अचानकपणे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. ही माहिती आधी मीडियाला कळाली आणि नंतर पोलीस आले याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात बोलताना जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापूरमध्ये याच मुद्यावर बोट ठेवत पोलिसांच्या अपशयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. आता दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने या हल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. विरोधक आणि सरकारमधून मिळणारे खडे बोल पाहता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची खुर्ची डळमळीत झालीय का, अशी चर्चा आता सुरू आहे.

थोरातांचे शरसंधान काय?

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवार देशातले जेष्ठ नेते आहेत. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. शासनापुढे अनेक अडचणी असतात. एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सरकारने कायम सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कालची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. मात्र, कुटुंबापर्यंत पोहोचून दगडफेक करणे निषेधार्ह आहे. त्यांना प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

तुमची यंत्रणा चांगली…

थोरात म्हणाले की, कोणत्याही संघटनेच्या आंदोलनाचे नेतृत्व महत्वाचे असते. दुर्दैवाने एसटी कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोण करतेय कळत नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे दिशाभूल करत आहेत. गुप्त वार्ताहर हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. पवारांच्या घरावर हल्ला होताना तुमचे कॅमेरे पोहोचतात, पण आमचे पोलीस पोहोचत नाहीत. तुमची यंत्रणा जास्त चांगली असे म्हणावे लागेल. ही गोष्ट जास्त गंभीरपणे घ्यावी लागेल.

पांडेय यांची दखल घेतली

थोरात म्हणाले की, महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अगोदर पासून काम करतो आहोत. शासनामध्ये काही अडचणी त्यामुळे झाल्या आहेत. संघटनेचे लोक काल सोलापुरात भेटले. आम्ही मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करतो आहोत. दुसरीकडे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची शासन दरबारी दखल घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. चूक होत असेल तर नक्की दाखवावी, पण संपूर्ण यंत्रणेला दोष देणे चुकीचे आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, अशी समजही त्यांनी दिली.

इतर बातम्या : 

Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…

ST Andolan Mumbai : ज्या भगिनी विधवा झाल्या…, पवारांच्या घरी काढलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.