हिंदू ही एकच जात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा लासलगावमध्ये दावा
ग्रंथ, धर्माला जात नाही. जात नसते. तसेच हिंदू धर्मात मारवाडी, ब्राह्मण, मराठा अशा आपण जाती मानतो. मात्र, खरे तर हिंदू ही एकच जात आहे, असा दावा शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी लासलगाव येथे केला.
नाशिकः ग्रंथ, धर्माला जात नाही. जात नसते. तसेच हिंदू धर्मात मारवाडी, ब्राह्मण, मराठा अशा आपण जाती मानतो. मात्र, खरे तर हिंदू ही एकच जात आहे, असा दावा शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी लासलगाव येथे केला. ते विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना बोलत होते.
भैय्याजी जोशी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात 1 लाख गावापर्यंत पोहचलो आहे. अजून सहा लाख गावांपर्यंत पोहोचायचे आहे. संघाचा उद्देश लोकांना संघटित करणे असा असून, संघाचे काम अत्यंत सकारात्मक आहे. नकारात्मक कामाला थारा दिला जात नाही. हिंदू शक्तिशाली असेल, तर देशात चांगले काम होईल. स्वताला हिंदू म्हणून घेतात ते जागरूक राहिले पाहिजे. या देशात 100 कोटी पेक्षा जास्त हिंदू आहेत, पण तो अनेक जातीत विभागल्या गेल्याने हिंदू एक संघ राहिला नाही. खरे तर ग्रंथ, धर्माला जात नाही. जात नसते. तसेच हिंदू धर्मात मारवाडी, ब्राह्मण, मराठा अशा आपण जाती मानतो. मात्र, खरे तर हिंदू ही एकच जात आहे, असा दावा भैय्याजी जोशी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आपण राज्या राज्यात विभागलो आहोत. मात्र, एका देशात राहतो. भारत माता की जय म्हणतो आणि राज्याचा अभिमान कशासाठी करायचा. आपला देश हा जम्मू, काश्मीर ते तमिलनाडू , राजस्थान, आसाम, मेघालयपर्यंत राज्यामध्ये विभागला आहे. मात्र, आपला देश एक आहे, हीच संघाची शिकवण असल्याचे ते म्हणाले. देश गुलाम नाही, पण आपले विचार गुलाम राहिले, तर देश गुलाम होईल. आपल्याकडे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी रोजी देश भक्ती दिसून येते. मात्र, इतर दिवशी देशभक्ती कुठे जाते, असा सवाल करून त्यांनी विदेशी वस्तूंचा त्याग करा. स्वदेशी वस्तू वापरा, असे आवाहन केले.
वारकरी संप्रदायाचे विचार आचरणात आणा देशात दुर्गेची पूजा होते, पण महिलांवर अत्याचार का होतात. वारकरी संप्रदायामध्ये चांगले विचार आहेत. ते आचरणात आणले पाहिजे. दुर्जनांना एकत्र आणण्यासाठी कुठेही संघटना नाही. मात्र, चांगल्या गोष्टींसाठी संघटना निर्माण करावी लागते. जो समाज चांगल्या गोष्टीचे पालन करतो, तो समाज सर्वात पुढे जातो. संघाच्या माध्यमातून देशात आजपर्यंत एक लाख गावांपर्यंत पोहचलो आहोत. अजून सहा लाख गावांपर्यंत पोहचायचे आहे, असा निश्चिय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या देशात 100 कोटी पेक्षा जास्त हिंदू आहेत, पण तो अनेक जातीत विभागल्या गेल्याने हिंदू एक संघ राहिला नाही. खरे तर ग्रंथ, धर्माला जात नाही. जात नसते. तसेच हिंदू धर्मात मारवाडी, ब्राह्मण, मराठा अशा आपण जाती मानतो. मात्र, खरे तर हिंदू ही एकच जात आहे. – भैय्याजी जोशी, सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
इतर बातम्याः
विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण https://t.co/nRnuEpmmYt #PMModi #Defence
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021