राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

| Updated on: Jul 17, 2021 | 8:14 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. (Raj Thackeray)

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात
chandrakant patil
Follow us on

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्यास त्यांच्यात युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. (bjp leader chandrakant patil to meet mns chief raj thackeray in nashik)

राज ठाकरे कालच नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीचा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार

तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांचा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम आहे. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही नाशिक दौऱ्यावर असून योगायोगाने तेही विश्रामगृहात उतरले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आज रात्री उशिरापर्यंत भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीत नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेती युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील आणि राज ठाकरे यांची पहिल्यांदाच ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ती भूमिका सोडली तर युती शक्य

दरम्यान, पाटील यांनी कालच मनसेशी युती करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. आमचा खूप जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेल. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं पाटील म्हणाले होते. (bjp leader chandrakant patil to meet mns chief raj thackeray in nashik)

 

संबंधित बातम्या:

राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाही, मनसे-भाजप युतीवर चंद्रकांतदादांचं मोठं विधान

दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही, लॉकडाऊनचं काय ते एकदाचं ठरवा: पाटील

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका

(bjp leader chandrakant patil to meet mns chief raj thackeray in nashik)