महायुतीच्या जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यालयातच ठिय्या

भाजप पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी करुन नाशिक लोकसभेची जागा शिवसेना ऐवजी भाजपला मिळावी, अशी मागणी करताना दिसत आहेत.

महायुतीच्या जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यालयातच ठिय्या
bjp
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 9:59 PM

नाशिक | 18 मार्च 2024 : नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात ठिय्या मांडला. नाशिकची जागा भाजपला सोडण्याच यावी, अशी घोषणाबाजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यालयात केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी करुन नाशिक लोकसभेची जागा शिवसेना ऐवजी भाजपला मिळावी, अशी मागणी करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे महायुतीतील जागावाटपाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत ठिणगी पडल्याचं बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. श्रीकांत शिंदे यांनी भाजपला विश्वासात न घेता अशाप्रकारे उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

नाशिकच्या जागेबाबत काय निर्णय होणार?

भाजपकडूनदेखील नाशिक जागेसाठी दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. या वाटाघाटी सुरु असताना श्रीकांत शिंदे यांनी थेट घोषणा केली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या व्हिडीओमुळे स्थानिक पातळीवर महायुतीत कशी रस्सीखेच सुरु आहे ते पाहायला मिळत आहे. आता वरिष्ठ पातळीवर नाशिकच्या जागेवर काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.