कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित होईना; उमेदवारीवरून खलबतं सुरूचं, पुण्यात चाललंय काय?

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक दिवसागणिक चुरशीची होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस बाकी असताना देखील उमेदवार निश्चित होईना. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढलीय.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित होईना; उमेदवारीवरून खलबतं सुरूचं, पुण्यात चाललंय काय?
अजित पवार, नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 6:55 PM

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अद्यापही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपचा (BJP) उमेदवार निश्चित होईना. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असताना अद्याप उमेदवार ठरेना. दुसरीकडे उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी दावेदार उमेदवारांनी अर्ज विकत आणलेत. त्यामुळं कुणाला अधिकृत उमेदवारी मिळते, कोण अपक्ष अर्ज दाखल करून माघार घेते, हे येणारी वेळचं सांगेल. पण, उमेदवार आतापासूनच तयारीला लागले आहेत. अजून उमेदवारी दाखल करण्यासाठी पाच दिवस बाकी आहेत.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक दिवसागणिक चुरशीची होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस बाकी असताना देखील उमेदवार निश्चित होईना. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बैठका घेऊन इच्छुकांची मत जाणून घेतली आहेत. कसबा आणि चिंचवडच्या जागेवरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय.

यांनी विकत घेतले अर्ज

दुसरीकडे उमेदवारी घोषित होण्याआधीच चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीने आणि राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले. कसब्यातून शैलेश टिळक यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

उमेदवारी घोषित केव्हा होणार?

पुढील दोन दिवसात महाविकास आघाडी आणि भाजपचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. सध्यातरी उमेदवारी अर्ज आणून पक्षाची तिकीट मिळविण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवार करताना दिसून येत आहेत.

कालच सर्व पक्षांचे उभेच्छुक एका कट्यावर आले होते. त्यांनी एकत्र बसून चर्चा केली. पण, कोणत्याही महत्त्वाच्या पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केली नाही. त्यामुळं उभेच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढत आहे. आधीपासून तयारी हवी म्हणून काही जणांनी उमेदवारी अर्ज आणून ठेवली आहेत. ज्या उमेदवाराला अधिकृत एबी फार्म मिळेल, तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.