नाशिकमध्ये चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, थेट दुध डेअरीच्या भिंतीला धडक, 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावरील अंजनेरी शिवारातील तुपादेवी फाट्यावर एका कारने थेट दुध डेअरीच्या भिंतीलाच धडक दिली. यात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय.

नाशिकमध्ये चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, थेट दुध डेअरीच्या भिंतीला धडक, 23 वर्षीय युवकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:25 AM

शैलेश पुरोहित, नाशिक : त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावरील अंजनेरी शिवारातील तुपादेवी फाट्यावर एका कारने थेट दुध डेअरीच्या भिंतीलाच धडक दिली. यात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. या कारचा क्रमांक MH15 DC3972 असा आहे. ही कार त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर धडकली. कारमध्ये एकटा चालकक होता. अपघातात तो जबर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हा कार अपघात मंगळवारी (3 ऑगस्ट) रात्री 11.30 ते 12.00 च्या दरम्यान घडल्याचे माहिती पोलीसांनी बुधवारी दिली. सुरज प्रकाशसिंग परदेशी त्र्यंबकेश्वर येथे नातेवाईकांना भेटून परत आपल्या घरी नाशिकरोड येथे जात असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, सचिन गांगुर्डे, घोडे यांनी घटनास्थळी भेट दिली

आई वडील लहानपणीच वारले, आता दोन भावांपैकी एकाचा मृत्यू

दरम्यान जखमी चालकास 108 क्रमांकाच्या रुग्ण वाहिकेतून नाशिक येथील रुग्णालयात अधिक उपचारार्थ नेले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात फक्त एक भाऊ आहे. आई वडील लहानपणीच वारलेले आहेत. हे दोघे भाऊ मावशीकडे राहात होते. अपघातग्रस्त गाडी देखील मित्राची असल्याची माहिती आहे.

त्र्यंबकेश्वर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोमरे पोलीस नाईक मेघराज जाधव प्रदीप भाबड अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

VIDEO: मुंबईच्या जेव्हीएलआर रोडवर भीषण अपघात; भरधाव वेगातील डंपरनं दुचाकीस्वाराला उडवलं

PHOTO : भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, कार चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात

सांगोल्यात भीषण अपघात, ओमनी चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, 9 जखमी

व्हिडीओ पाहा :

Car accident in Nashik 23 year old driver dead

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.