भुजबळांनी सांगितला नाशिकच्या विकासाचा प्लॅन, म्हणाले आरोग्य जपत…
प्रत्येकाने स्वत:चे व कुटूंबाच्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे. विकास हा जनतेसाठी असून, नागरिकांचे आरोग्य जपत विकास साधणार, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले आहेत.
नाशिक :- कोरोनाचा (Corona) प्रार्दूभाव कमी झाला असला तरीही धोका अजून टळलेला नाही. प्रत्येकाने स्वत:चे व कुटूंबाच्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे. विकास हा जनतेसाठी असून, नागरिकांचे आरोग्य जपत विकास साधणार, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले आहेत.निफाड येथील गाजरवाडी येथे आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, निफाडचे तहसिलदार शरद घोपरडे, गटविकास अधिकारी संदिप कराड, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अर्जून गोसावी, शाखा अभियंता गणेश चौधरी, गाजरवाडीचे सरपंच प्रकाश दराडे, शिरवाडेचे सरपंच डॉ. श्रीकांत आवारे, भाऊसाहेब भवर, बाळासाहेब पुंड, बबन शिंदे, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, बबन नाना शिंदे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोठा ऑक्सिजनसाठा उपलब्ध
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना काळात विकासकामांवर मर्यादा होती. परंतु आता अर्थचक्र गतिमान होत असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विकासकामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून जलदगतीने थांबलेली विकासकामे निश्चितच पूर्ण केली जात आहेत. कोरोना काळात आरोग्यविषयक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. आज ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला असून 450 मेट्रीक टन ऑक्सीजन उपलब्ध आहे. आगामी लाटेच्या अनुषंगाने 750 मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धता सुध्दा त्वरीत होऊ शकेल यासाठी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन निर्मिती युनिट तयार केले गेले आहेत, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
गाजरवाडी येथील या कामांचे झाले भुमीपूजन व लोकर्पण
निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील प्रमुख जिल्हा मार्ग 69 गाजरवाडी धारणगाव रस्ता प्रजिमा.किमी 18/300 ते 22/200 ची सुधारणा करणे ता. निफाड जि नाशिक कामाचे भुमीपूजन (रु.350 लक्ष), निफाड पंचायत समिती मधील निधीतुन आदिवासी बस्तीत पाण्याची टाकीचे लोकार्पण (रु.7 लक्ष), “क” वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बुवाजी बाबा मंदिर संरक्षण भिंत लोकार्पण करणे (रा.8 लक्ष), 15 वा वित्त आयोग अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रु.4.37 लक्ष), जनसुविधा विशेष योजनेअंतर्गत स्मशानभूमी अनुषंगिक कामे (निवारा घोड बांधकाम ) (रु.10 लक्ष) आदी कामांचे भूमीपूजन व लोकार्पण आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
केडीएमसीच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला, भाजपचा कोर्टात जाण्याचा इशारा तर गाव समितीचा बहिष्काराचा इशारा
बेस्टच्या 900 ई- बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळ्याचा आरोप, भाजप नेत्यांचा नेमका दावा काय?
VIDEO | ठाकरेंविरोधात बोललात तर महागात पडेल, भाजप आमदार प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी