नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळीः’हस्ता’चे आजपासून ‘गुलाबी’ धुमशान; नाशिकला यलो, जळगावला रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Rose Hurricane) आज सोमवारपासून (27 सप्टेंबर) नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो, तर जळगावला (Jalgaon) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळीः'हस्ता'चे आजपासून 'गुलाबी' धुमशान; नाशिकला यलो, जळगावला रेड अलर्ट
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 10:39 AM

नाशिकः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Rose Hurricane) आज सोमवारपासून (27 सप्टेंबर) नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो, तर जळगावला (Jalgaon) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Chance of rain again from today, Meteorological Department issued yellow alert to Nashik and red alert to Jalgaon)

गेल्या महिनाभरापासून नाशिक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. आतापर्यंत गोदावरीला दोनदा पूर आला. त्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याचे वाटत असतानाच आता बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पाऊस होणार असून, तर आठवडाभर पावसाचा मुक्काम राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यात यंदा सरासरीच्या दु्प्पट पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 94.35 टक्के पावसाची नोंद झाली, तर दुसरीकडे चांदवड, सिन्नर, दिंडोरीला कमी पावसाची नोंद झाली आहे. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील बंधारेही अजूनपर्यंत भरलेले नाहीत.

हस्त नक्षत्र सुरू

हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जळगावला रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पावासाची नोंद झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे.

अलर्ट का दिले जातात?

पावसाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यासाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात येतात. त्यात 64 मिमीपर्यंत पाऊस होणाच्या अंदाज असलेल्या भागासाठी यलो अलर्ट देतात. 64 ते 115 मिमि पाऊस होण्याचा अंदाज असलेल्या भागासाठी ऑरेंज अलर्ट, तर 115 ते 204 मिमी पाऊस होण्याचा अंदाज असलेल्या भागासाठी रेड अलर्ट देण्यात येतो. (Chance of rain again from today, Meteorological Department issued yellow alert to Nashik and red alert to Jalgaon)

इतर बातम्याः

यूपीतील कथित धर्मांतर प्रकरणी ATS ची कारवाई, नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला नाशकात अटक

‘पाणी’ डोक्यावरुन चाललंय, पाणीपट्टी थकवणाऱ्यांचं नळ कनेक्शन तोडणार, नाशिक पालिकेचा निर्णय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.