आज पुन्हा झोडपणार, नाशिकमध्ये पाऊस सुरू; जाणून घ्या उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज

नाशिकमध्ये गुरुवारी सकाळी लख्ख ऊन पडले होते. मात्र, दहानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. मात्र, 11 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

आज पुन्हा झोडपणार, नाशिकमध्ये पाऊस सुरू; जाणून घ्या उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
पाऊस
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 11:19 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुरुवारी (23 सप्टेंबर) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Chance of rain in North Maharashtra including Nashik today)

नाशिकमध्ये गुरुवारी सकाळी लख्ख ऊन पडले होते.दहानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. मात्र, 11 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील जैसलमेर ते पूर्वेकडील डाल्टनगंजपर्यंत सक्रिय असून, पश्चिम बंगालमध्ये गंगेचा मैदान परिसर आणि तामिळनाडू किनाऱ्यावर चक्रीय चक्रावात आहे. या सोबतच दक्षिण कर्नाटक ते कामोरीन असाही कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे. बुधवारी दुपारी हा विसर्ग 8 हजार क्युसेकपर्यंत नेण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला वर्षातला दुसरा पूर आला. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी गेले. नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली. त्यामुळे नागरिकांनी नदीत पोहायला जावू नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

गाव पाण्यात

मालेगाव तालुक्यातल्या साकोरीला मुसळधार पावसाने झोडपले. अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. सगळ्या गावात पाणी शिरले होते. स्मशानभूमी, शाळा, रस्ते, घरांतसुद्धा पाणी शिरले. गावाजळच्या नदीला पूर आला. यापूर्वी गेल्या आठवड्यातही साकोरीमध्ये असाच पाऊस झाला होता. या पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले. मात्र, कसलिही दुर्घटना घडली नाही. पाऊस वाढला असता, तर गावकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असते.

पिकाचे नुकसान

साकोरीमध्ये यापूर्वीही असाच पाऊस झाला होता. आता पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्यात जमा आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहेत. दसरा, दिवाळीचे सण तोंडावर आले आहेत. खरिपाचे पीक आले, तर हातात चांगला पैसा खुळखुळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, या आशेवर पावसाने सध्या तरी पाणी फिरले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (Chance of rain in North Maharashtra including Nashik today)

इतर बातम्याः

कुबेराचं धन महाग…नाशिकमध्ये सोन्याला झळाळी!

नाशिकमध्ये ऑक्सिजनची तिप्पट वाढ करण्याच्या सूचना; संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.