महाराष्ट्राच्या मंत्र्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून थेट ताकीद, भाजपच्या गोटातून मोठी बातमी

भाजपची (BJP) नाशिकमध्ये आज अतिशय महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandradshekhar Bawankule) यांनी भाजपच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून थेट ताकीद, भाजपच्या गोटातून मोठी बातमी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 6:15 PM

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. भाजपची (BJP) नाशिकमध्ये अतिशय महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandradshekhar Bawankule) यांनी भाजपच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिल्याची माहिती मिळत आहे. मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनीदेखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

“मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य करू नये. देवेंद्र फडणवीस हेच फक्त राजकीय विषयांवर बोलतील. तसेच भाजपच्या प्रवक्त्यांनी वायफळ विषयांवर बोलू नये”, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भाजपच्या गोटात हालचालींना वेग

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (BJP) चांगलाच कामाला लागला आहे. राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकांची चर्चा आहे. या निवडणुकांनंतर राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील मोठमोठ्या शहारांच्या महापालिकांची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीला मिनी विधानसभा निवडणूक मानलं जातं. कारण या निवडणुकीत महाराष्ट्राचा नेमका मुड काय, नागरिकांच्या मनात नेमका कोणता पक्ष आहे? याचा अंदाज येतो.

विशेष म्हणजे या निवडणुका पार पडल्यानंतर लगेच पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुका होतील. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक पार पडेल. या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप चांगलीच कामाला लागली आहे.

भाजपचे ठरले; ‘महाविजय 2024’

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीसाठी ‘महाविजय 2024’ म्हणून संकल्प केला आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या कार्यकारिणी बैठकीत भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

आमदार श्रीकांत भारतीय निवडणूक इन्चार्ज म्हणून काम पाहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपात प्रवेश

भाजपच्या या कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा यावेळी भाजपात प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कलाकारांचा आज भाजपात प्रवेश झाला. प्रिया बेर्डे यांनी दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी आज भाजपात प्रवेश केलाय.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.