नाशिक: राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्ह्यासह पालघरमधील जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जावं लागणार असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (chhagan bhujbal first reaction on zilla parishad election in maharashtra)
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आरक्षणाशिवायच निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अडचण निर्माण झाली आहे. निवडणुका तर होतील, मात्र आरक्षणासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. सर्व पक्षांनी ओबीसी उमेदवारचं देण्याचं जाहीर केलं आहे. पक्षांची ही भूमिका दिलासादायक आहे. त्यामुळे ओबीसींच्या प्रतिनिधीत्वाचा प्रश्न निर्माण होणार नाही, असं ते म्हणाले.
इंपेरिकल डेटा मिळवण्यासाठी केंद्राच्या मागे लागलो आहोत. आयोग देखील स्थापन केला आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यात काय होत ते बघू, असं त्यांनी सांगितलं.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.
पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील, असं त्यांनी सांगितलं.
15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल
जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पचंयात समितीच्या 144 जगाा
धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16
धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31 (chhagan bhujbal first reaction on zilla parishad election in maharashtra)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 14 September 2021 https://t.co/ExxXBsoVvX #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान
(chhagan bhujbal first reaction on zilla parishad election in maharashtra)