अधिकाऱ्यांनो, स्वत: लक्ष घालून विकासकामे पूर्ण करा; भुजबळांचं आवाहन

छगन भुजबळ यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील 42 गावांच्या परिसरात आज विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी 27 लक्ष 50 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. (chhagan bhujbal inaugurates development projects in nashik)

अधिकाऱ्यांनो, स्वत: लक्ष घालून विकासकामे पूर्ण करा; भुजबळांचं आवाहन
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 3:14 PM

नाशिक: कोरोनाच्या संकटाशी सामना करत पुन्हा विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. आता अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत, असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. (chhagan bhujbal inaugurates development projects in nashik)

छगन भुजबळ यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील 42 गावांच्या परिसरात आज विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी 27 लक्ष 50 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट असल्याने विकास कामांवर काही मर्यादा येत होत्या. त्याचबरोबर अतिवृष्टीसह अनेक संकटे राज्यावर आली आहेत. या परिस्थितीतूनही मार्ग काढत शासनाच्या माध्यमातून विकास कामे करत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी विकास कामांमध्ये लक्ष घालून ही कामे पूर्णत्वास आणावीत, असे आवाहन त्यांनी केले.

तिसऱ्या लाटेची शक्यता, काळजी घ्या

कोरोनाची अद्यापही तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेऊन लसीकरण करून घ्यावे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेशन प्लँटची निर्मिती करणे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही. कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांनी अविरतपणे काम करत अन्न, धान्याचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही. शेतकऱ्यांचे हे योगदान अतिशय महत्वाचे आहे, असं सांगतानाच कोरोनाच्या काळात राज्यात 55 हजार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून 8.5 लाख टनाहून अधिक अन्न धान्याचे वाटप करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करण्यात आले, असं ते म्हणाले.

म्हणून कोरोना रोखण्यात यश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासाची कामे ठप्प असतांना देखील येवला मतदारसंघात विकासाची कामे अविरत सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी योग्य नियोजन केल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र शासनाकडून विकासाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत, असं जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितलं.

विविध कामांचं उद्घाटन

भुजबळ यांच्या हस्ते आज निफाड तालुक्यातील ब्राम्हाणगांव (वनस) अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण, रस्ता कॉक्रिटीकरण व भूमीगत गटार करणे, जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत व्यायामशाळा बांधणे कामाचे भुमीपूजन, ग्राम निधी अंतर्गत वॉटर फिल्टर बसविणे, 2702 योजने अंतर्गत दोन साठवण बंधाऱ्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. वनसगांव येथे 2515 योजने अंतर्गत वनसेबाबा देवस्थानचे सुशोभिकरण, मुलभूत सुविधा योजने अंतर्गत गोरक्षनाथ मंदिराजवळ सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.

त्याचबरोबर सारोळे खुर्द येथे पिंपळगांव ते लासलगांव रस्त्यावरील सेलू नदीवर मुंजोबा फाट्याजवळ पुलाचे, आमदार निधी अंतर्गत सभामंडप कामाचे, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सभामंडप कामाचे, समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्तीतत सभामंडपाचे, समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्तीतत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे तसेच जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभुमी बैठक व्यवस्था, स्मणशानभुमीत अनु‍षांगिक कामाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच लासलगांव येथे पिंपळगांव ब. पालखेड लासलगांव मनमाड रस्त रामा क्र. 29 कि.मी. 117/610 ते 124/100 (खानगांव फाटा ते लासलगांव) रस्ता कामाचे, पिंपळगांव (ब) पालखेड लासलगांव मनमाड रस्ता रामा क्र. 29 कि.मी. 120/600 ते 124/100 (खानगांव फाटा ते लासलगांव) कॉक्रिट गटार कामाचे भूमिपूजन करण्यात आले. (chhagan bhujbal inaugurates development projects in nashik)

संबंधित बातम्या:

पोलीस असल्याचं भासवत लुटलेला दीड कोटीचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या 72 तासांत आरोपींना बेड्या

लोकल सुरू करण्याबाबत दोन आठवड्यांपासून चर्चा, दोन दिवसात निर्णय कळेल; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

शरद पवारांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंची भेट; पवारांच्या भेटीगाठी सुरूच

(chhagan bhujbal inaugurates development projects in nashik)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.