अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?, चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप; चौकशीची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. (chitra wagh slams mahavikas aghadi over pooja chavan suicide case)

अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला 'तो' नंबर कुणाचा?, चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप; चौकशीची मागणी
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 1:15 PM

नाशिक: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी अरुण राठोडने पुणे कंट्रोल रुमला कबुली जबाब दिला होता. त्यानंतर कंट्रोल रुमवरील एका महिलेने दुसरा नंबर देऊन त्या नंबरवर कबुली जबाब द्यायला सांगितला. हा नंबर कुणाचा होता? त्या नंबरवर कुणाकडे कबुली जबाब दिला? असा सवाल करतानाच या नंबरचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. (chitra wagh slams mahavikas aghadi over pooja chavan suicide case)

चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार घेऊन पुणे पोलिसांचा तपास आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. पूजाने आत्महत्या केल्यानंतर अरुण राठोडने कंट्रोल रुमला कबुली दिली होती. कंट्रोल रुमला एक महिला होती. या महिलेने संबंधित व्यक्तीला 9146870100 या क्रमांकावर संपर्क साधून कबुली देण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने सकाळी 8 वाजून 40 मिनिटाने या नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने दोन मिनिटे थांबण्यास सांगितलं. आणि कॉन्फरन्स कॉलवर आणखी एका व्यक्तीला घेऊन पुन्हा एकदा कबुली द्यायला सांगितली. त्यानंतर कबुली जबाब देणाऱ्या व्यक्तीने तुम्ही कोण? असं विचारताच असं नाव सांगता येत नाही, असं सांगितलं, असा गंभीर आरोप करतानाच हा नंबर कुणाचा होता? कॉन्फरन्स कॉलवर आलेला व्यक्ती कोण आहे? हा नंबर पोलीस आयुक्तांचा आहे की पोलीस महासंचालकांचा आहे? पुणे कंट्रोल रुमच्या कोणत्या अधिकाऱ्याने हा नंबर दिला? कोणत्या अधिकाऱ्याचा नंबर दिला? याची चौकशी करण्याची मागणी वाघ यांनी केली.

राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली तर नवल नाही

पूजा चव्हाण प्रकरणात सर्व गोष्टी योगायोगाने घडत आहेत. आणि राज्यातील तिन्ही पक्षाचे नेते बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. या सरकारने व्याभिचाराचे उदात्तीकरण सुरू केलं आहे. आता अधिवेशन सुरू होत आहे. विरोधक या प्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याने आज जर संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आल्यास आणि ते क्वॉरंटाईन झाल्यास मला नवल वाटणार नाही. कारण हे सर्व प्रकरण योगायोगानेच घडत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ही कसली शिवाशाही ही तर मोगलाई?

पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांच्या नावाने 45 फोन कॉल्स आले होते. हा राठोड कोण? पोलिसांनी ते मिस्ड कॉल पाहिले की नाही? मिस्ड कॉल असणाऱ्या व्यक्तीचा शोध का घेतला नाही? असा सवालही त्यांनी केला. 16 दिवस होऊनही पूजा चव्हाण प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल का करण्यात आला नाही? असा सवालही त्यांनी केला. 12 ऑडिओ क्लिपचं काय झालं? बलात्काऱ्याला सरकार का वाचवत आहे? एवढे पुरावे असतानाही एफआयआर का दाखल केला जात नाही? ही कसली शिवशाही ही तर मोगलाई आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

त्यांना मला अडकवायचं होतं

माझ्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं, असा दावा वाघ यांनी केला. मी न घेतलेल्या कर्जाचंही मुंबै बँककडे चौकशी करण्यात आली होती, कारण मला अडकवायचं होतं, असं त्यांनी सांगितलं. (chitra wagh slams mahavikas aghadi over pooja chavan suicide case)

पवारांची आठवण होते

5 जुलै रोजी माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज मला शरद पवारांची आठवण होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांनी मला बोलावून घेतलं. तक्रारीची कॉपी वाचली आणि तुझा नवरा कशातच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली, असं त्या म्हणाल्या. केवळ चित्रा वाघचा नवरा म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाच घेताना माझा नवरा घटनास्थळीही नव्हता. ज्यांनी लाच घेतली त्यांची चौकशीच सुरू आहे. पण माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ पूजा चव्हाण प्रकरण लावून धरल्यामुळेच आणच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (chitra wagh slams mahavikas aghadi over pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

LIVE | धनंजय मुंडेंना सोडलं, आता राठोडला सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव? – चित्रा वाघ

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी होणार

चित्रा वाघ यांच्या पतीचं काय आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण?; वाचा सविस्तर रिपोर्ट

(chitra wagh slams mahavikas aghadi over pooja chavan suicide case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.