‘तांदुळ शिजण्याऐवजी थेट वितळले’, नाशिकमध्ये पोषण आहारात प्लास्टिक तांदुळ असल्याचा आरोप
अनेकदा सरकारी योजनांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंगणवाडीतील पोषण आहारात थेट प्लास्टिकच्या तांदुळाचा पुरवठा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.
नाशिक : अनेकदा सरकारी योजनांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंगणवाडीतील पोषण आहारात थेट प्लास्टिकच्या तांदुळाचा पुरवठा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. वाघेरा पैकी कसबेपाडा अंगणवाडी केंद्रातून महिलांना तेल, मिठ, दाळी, तांदूळ असे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी तांदूळ शिजवण्यासाठी निवडत असताना ग्रामस्थ संगिता चंदर जाधव, हिराबाई लहानू बदादे यांना हा तांदूळ भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आले. हा तांदूळ शिजवण्यासाठी ठेवला असता तो शिजण्याऐवजी वितळला. यानंतर या ग्रामस्थांनी हा तांदुळ प्लास्टिकचा असल्याचा आरोप केलाय.
गावकऱ्यांसमक्ष पंचनामा करुन हा तांदूळ परिक्षणाची मागणी
या प्रकारानंतर या घटनेची माहिती ग्रामपंचायतीला कळविण्यात आली. सरपंच यशोदा दिलीप खेड्डुलकर, उपसरपंच रामचंद्र काळू बदादे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांसमक्ष पंचनामा करुन हा तांदूळ परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवावा व तांदूळ बदलून मिळावा, अशी मागणी केलीय.
पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी
यानंतर तालुका श्रमजिवी संघटनेच्या वतीने त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान डोखे, सचिव तानाजी शिद, भिकचंद बदादे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात भेसळ, प्लास्टिकचा तांदुळ सापडल्यानं खळबळ
सरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप
गोरगरीबांचा अन्नासाठी संघर्ष, केंद्राने ‘या’ निर्णयाचा पुनर्विचार करावा, सुप्रिया सुळे यांची विनंती
व्हिडीओ पाहा :
Citizens complaint about plastic rice in anganwadi in Kasabepada Tryambakeshwar Nashik